पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ पुढील आयुष्य. लघ्वी होऊन जीव गळून गेला. तेव्हां आमच्या हिला उठवून थोड़ें सें लाहीपीठ खाल्ले व पडून राहिलों, तोंच घाम येऊन ताप उतरला व गांठही जिरून गेली. ” असे या प्रसंगाचे त्यांनी एकदां वर्णन केले. यानंतरही त्यांना , एकदां प्लेग झाला होता व त्या वेळेलाही कांही उपचार न करितां तीन दिवस नुसतं निजून राहूनच त्यांनी त्याला हाकलून लाविला. नारायणराव छत्रे, सुंदरलाल, वगैरे लोभांतली मंडळी औषधोपचाराचा आग्रह करीत असतां, रागावून ते त्यांना म्हणाले, – " औषधांनी मी वांचेन असें तुम्हीं लिहून देतां कां ? नाही तर मी मरणार नाही, असे मी तरी सांगतों !" अशी- त्यावेळची हकीगत ऐकिवांत आहे. प्लेगच्या धामधुमनिंतर लागलीच धुळ्याच्या बुवासाहेबांचें निर्माण झाले; व तेथून यांच्या आयुष्यांतील एका भागास सुरुवात झाली. धुळ्याचे नारायणबुवा यांचे त्रोटक चरित्र प्रसिद्ध झालेले आहे, पण त्यांतील माहिती अगदींच अपुरी आहे, असे अण्णासाहेब सागत असत. महाराज श्रीनृसिंहसरस्वती यांच्या वेळच्या खेळांतील नारायणबोवा हे त्यांचे पट्टारीष्य होत. 'नारायण माझे हृदय आहे,' असे महाराज म्हणाल्याचे सांगतात. बुवासाहेबांचा अधिकार फारच मोठा असून महाराजांच्या कृपेनें अध्यात्मिक पूर्णता त्यांची झाली होती असे अण्णासाहेब सांगत असत. लौकिक दृष्टया त्यांची समाधी वगैरे होऊन संस्थान उत्सव वगैरे लीला व्हावयाची आहे, हे आपणास महाराजांनी त्यांच्या निर्याणापूर्वीच सात वर्षे दाखविलें होतें, असें ते सांगत; व जरी त्यांच्या समा- धीच्या वेळीं, अण्णासाहेब धुळ्यास नव्हते, तरी महाराजांनी दाखविलेल्या ठिकाणच त्यांना समाधी दिली गेली. बुवासाहेब श्रीदत्तजयंतीच्या उत्सवास अण्णासाहेब यांना नेहमच पाचारण करीत. परंतु कांहींना कांहीतरी कारणाने त्यांचें जाणे होत नसे. परंतु शके १८२१ साली मात्र दत्तजयंतीच्या उत्सवास जावें. असे अण्णासाहेबांनी ठरविलें. बुवासाहेबांच्या प्रत्यक्ष हांतून असा हा शेवटचा उत्सव आहे, अर्से त्यांस माहीत असावेसें दिसतें. त्यांनी यावें म्हणून बुवासाहेबांनीही निमित्ताला, त्यांचे गळ्यांत, उत्सवाकरितां सांगलीचे तूप घेऊन येण्याचे टाकले होतें. “ धुळ्यास गेलों तो टांगा पुलावर नेऊन आध मुकाट्यानें समाधीची जागा पाहून घेतली व मग घरी गेलों, " म्हणून ते