Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेशव्यांचा पूर्व वृत्तांत. १२३ पहिल्यांदा विरोध कसा केला, व पुढे हळू हळू त्याची उपयुक्तता लोकांस पटून तो उत्सव सर्वमान्य कसा झाला, हे सर्वांस माहांतच आहे. प्रथमतः लोकमान्य टिळक यांचेंही मन या उत्सवाच्या उपयुक्ततेविषयी साशंक होतें. परंतु त्याला एथे आणून जेव्हां बराच काथ्याकूट केला, तेव्हां कुठें त्याची समजूत पटली व त्यानंतर केसरीतून अनुकूल लेखही येऊं लागले. " वगैरे हकीकत ते सांगत. त्यानंतर टिळकांनी या चळवळीचा त्यांच्या • स्वभावास अनुसरून इतका पुरस्कार केला की पुढे पुढे तर टिळक आणि गणपतिउत्सव हे दोन्हीही एकजीव होऊन गेले. आणि आज तर एका काळी या उत्सवास ते अनुकूल नव्हते ही गोष्टही लोक विसरून गेले असून त्यांच्याकडेच या उत्सवाचें उत्पादकत्व देण्यांत येतें इतकी त्यांनी या उत्स- वांत कामगिरी केली. गणपतीचा उत्सव पुण्यास पेशव्यांनी सुरू केला असे म्हणतात. गण- पतिमहालांत असलेल्या सोन्याच्या गणपतीपुढें तो अत्यंत थाटानें साजरा कर- ण्यांत येत असे. अण्णासाहेब असे सांगत असत की ज्याप्रमाणें श्रीगजाननाच्या उपासनेनें पटवर्धनास वैभव प्राप्त झाले, त्याचप्रमाणे पेशव्यांनाही वैभव येण्याचे कारण श्रीगजाननाचा वरप्रसाद हेच होय. याविषयी ते एक मनोरंजक दंत- कथाही सांगत असत. प्रसिद्ध गणेश दैवज्ञ घोटवडेकर हे पूर्वी जंजिऱ्याचे सिद्दयांचे पदरीं होते. वृद्धापकाळामुळे गणेश दैवज्ञ यांचे ऐवजी त्यांचे चिरंजीव केशवशास्त्री हे पुढें पुढे दरबारांत जात असत. एक वेळ अशी मौज झाली की, 'चंद्रदर्शन अमुक दिवशी आहे, ' असें दरबारांत चद्दिशों केशवशास्त्र्यांनी सांगून दिले. मुसलमानी शास्त्रांत चंद्रदर्शनाचें माहात्म्य मोठे व त्यावर त्यांचें धार्मिक आचार अवलंबून असतात आणि तेवढ्याकरितां चांगले ज्योतिषी मुसलमानी राजांच्या पदरी ठेवलेले असत. केशवशास्त्री दरबारांतून आल्यावर त्यांची चूक त्यांच्या लक्षांत आली; कारण त्या दिवशी अगदीं पूर्ण अमावास्या होती. तेव्हां आतां काय करावें, असा विचार पडून त्यांस कांही सुचेनासे झाले. एक. तर लौकिकास धक्का आणि दुसरें मुसलमानांशी गांठ. नुसतें जहागीर जाण्या- वर भागले तर नशीब नाहीं तर प्राणाशीही गांठ पडावयाची. अखेर त्यांनी ही गोष्ट वडिलांस सांगितली. तेव्हां तेही चिंताक्रांत झाले, परंतु त्या कालास