Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ पुढील आयुष्य. 'अनुसरून त्यांचा देवावर विश्वास चांगलाच होता. तेव्हां आतां बुद्धिदाता 'श्रीगजानन काय करील तें खरें, असें म्हणून त्यांनी देवघरांत जाऊन धरणे `घेतलें. शेवटी वद्य चतुर्दशीस त्यांना असा दृष्टांत झाला की, “घावरूं नकोस, उद्यां पहांटेस उठून तळ्यावर जा, व तेथें अमुक अमुक ठिकाणी मी आहे, मला बाहेर काढ, व माझ्या हातांतील एक कडें पाण्यांत टाकून मला घरीं घेऊन ये. " त्याप्रमाणे सुप्रभात मोठ्या आनंदाने गणेश देवज्ञांनी पाण्यांत उतरून पाहिलें तो गजाननाची अष्टधातूंची, परंतु विशेषतः सुवर्णाची एक फार सुंदर मूर्ति त्यांस सांपडली. तिच्या अंगावर सर्व तऱ्हेचे अलंकार असून, हातांत सोन्याची रत्नजडित वलये होती. आज्ञेप्रमाणे एक कडें पाण्यांत टाकून ती मूर्ति गणेश दैवज्ञांनी घरी आणली, व पुढे श्रीगजाननाच्या आश्वासना- प्रमाणे सिद्दीच्या २० मैलांच्या टापूंत त्या दिवशी अमावास्या असतांनाही लोकांस चंद्रदर्शन झालें ! ही मूर्ति परंपरेने पुण्यांतील घोटवडेकर यांचे हाती आली, व ती आपण डोळ्यानें प्रत्यक्ष पाहिली आहे असे अण्णासाहेब सांगत असत, असो. 33 त्याप्र- यानंतर इतर गांवच्या लोकांचा आणि सिद्दीच्या टापूंतील लोकांचा वाद होऊन, उभयतां बापलेकांच्या विद्वत्तेची फारच वाखाणणी झाली, आणि अशा ज्योतिषाचा चांगला फायदा घ्यावा म्हणून, शिद्दयांनी त्यास अशी आज्ञा दिली कीं, “ ज्या मुहुर्तावर काम सुरू केले असतां किल्ला अजिंक्य होऊन, दुस- ज्याच्या ताव्यांत कधीही जाणार नाही, असा मुहूर्त काढून द्यावा. माणे पुष्कळ दिवस गणित करून, गणेश देवज्ञांनी एक मुहूर्त काढून दिला, आणि त्या मुहूर्तावर सुप्रसिद्ध जंजि-याचा किल्ला बांधण्यास सुरुवात करावयाची अर्से ठरलें. परंतु कांही योगायोगामुळे असे झाले की तो मुहूर्त बिनचूक न साधतां थोडासा घोंटाळा झाला. त्यावरून गणेशदैवज्ञांनी सांगितले कीं, हा किल्ला जवळ जवळ अजिंक्यच राहून, कित्येक वर्षांनी, रविवारी तिसऱ्या प्रहरीं कोणीतरी ब्राह्मण शत्रु पाडाव करील. त्यावेळी अशा कोणा ब्राह्मणशत्रूची कल्पनाच नव्हती; तरीपण, या भावी संकटाचा प्रतिकार करावा म्हणून, असा हा शत्रु तरी कोठें उत्पन्न होणार, म्हणून शिद्दयानें गणेशदैवज्ञांस विचारलें. तेव्हां उपासनेच्या जोरावर गणेश देवज्ञांनींही असे सांगितले की, याच राज्यांत असलेल्या भट कुळांतील कोणी पुरुष हें काम करील. तेव्हां मुळावरच कुठार