पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ पुढील आयुष्य. दिवशीं दिली व त्यांनी मला दिली. या स्तोत्राची दुसरी प्रत वैशाख व० ८ शके १८१४ शुक्रवारच्या रात्री पहांटेस करून शनवार वद्य १० मी रोजी दांडेकर यांस दिली. पहिल्या प्रतीत 'धी' अक्षर चुकून राहिलें होतें तें घातलें. नामें २८ च ३० नाहीत हें सिद्ध तीस नांवांच्या छापील प्रती- वरून नित्य स्तोत्र म्हणावें, असे माझ्या मनांत पुणे येथे सुमारें तीन दिवसां- पूर्वी आले, व शनवार फा० व० ५ मीस आरंभ करण्याचें 'माझें ठरलें. हैं दांडेकर यांस मुळींच कोंकणांत माहीत पडण्याचें कारण नाही. असे असून त्यांनी शनवारी ही प्रत आणून दिली. यावरून श्रींचे ईश्वरत्व म्हणजे सर्व- ज्ञत्व, सर्वसाक्षित्व, सर्वव्यापकत्व, इत्यादि, व दांडेकर यांची योग्यता व श्रींचे ठिकाणी भक्ति, ही सर्व दिसून येतात. " दोन तीन दिवसांनी दांडे- कर यांस भाड़ें देऊन, अण्णासाहेबांनी रवाना करून दिलें. पुढे एक दिवस महाराजांनी त्यांना सांगितले की, 'रेल्वे कंपनीचें कर्ज ठेऊं नको. उगीच अनेकपट द्यावें लागेल. त्यावरून अण्णासाहेबांनी बुधवारांत जाऊन एक मुंबईचें तिकिट काढून आणलें, व अशा रीतीनें मुंबईहून दादांना महाराजांनी फुकट आणलें, तें कर्ज देऊन टाकलें. हैं तिकिट अखेरपर्यंत त्यांच्याजवळ होतें, व ही हकीगत सांगतांना क्वचित् प्रसंगी तें ते काढूनही दाखवीत असत. असो. या लहानशा दिसणाऱ्या गोष्टांचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर बराच झाला असावा असे दिसतें. कारण केव्हांही त्यांच्या बोलण्यांत या गोष्टांचा फार उल्लेख येत असे. . यानंतर पुढें लौकरच श्रीगणपती उत्सवाची कल्पना निघाली. गणपतीचे उत्सव तर पुण्यांत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणांत पूर्वीपासूनच होत असत, परंतु या उत्सवास सार्वजनिक स्वरूप देऊन त्याचा उपयोग राष्ट्रीय दृष्टया ( राजकीय नव्हें ) करून घेण्याची कल्पना पूर्वी कोणाच्या डोक्यांत आली नव्हती. यासंबंधानें प्रत्यक्ष त्यांनी सांगितलें नसले तरी आमच्या ऐकिवांत असें आहे कीं, ही कल्पना मुख्यत्वेंकरून अण्णासाहेव यांचीच होती, व तिची सर्व तऱ्हेची उठावणी, सुप्रसिद्ध भाऊसाहेब रंगारी वगैरे खट- पटी गृहस्थांना हाती धरून अण्णासाहेब यांनी कली, व तिला मूर्त स्वरूप दिलें. प्रत्यक्ष आपला संबंध त्यांत असल्याचें जरी ते बोलत नसत, तरी या पहिल्या पहिल्या उत्सवांची हकीकत त्यास चांगल्या चांगल्या लोकांनीही