पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रज्ञावर्धनस्तोत्र. १२१ जावयाचें होते व त्याकरतां भी हें बोटीचें तिकीटही काढले आहे; परंतु इतक्यांतच एक अतिशय महत्त्वाचें काम निघाल्यामुळे मला येथे राहणें जरूर आहे. तेव्हां काय करावें, याच फिकिरींत मी पडलों होतों; आतां तुम्हीच भेटलांत वरें झाले; माझेंच तिकिट घेऊन जा, व मोती पोहोंचवून तुम्हांस कोठें जावयाचें असेल तेथें जा. " दादांनाही श्रीमहाराजांच्या योजनेचे कौतुक चाटून तत्काळ ती गोष्ट कबूल करून ते मुंबईस येऊन पोहोचले. मुंबईस मोत्याचे काम केल्यावर, तसेच पूर्वीसारखें निर्धारानें बोरीबंदरवर येऊन थड- कले. त्यांना कोणीही मज्जाव केला नाहीं; व ते सरळ गाडींत जाऊन बसले. चातही कोणीं त्यांस कांहीं विचारले नाहीं. त्याचप्रमाणे पुण्यासही कोणी कांहीही विचारल्याशिवाय गाडींतून उतरले, ते सरळ तिकिट कलेक्टरच्या अंगांवरून बाहेर येऊन थट घरी येऊन पोहोचले. याप्रमाणे हकीगत कळल्यावर दादांनी लिहून आणलेले काय आहे, हें अण्णासाहेब पाहतात, तो प्रज्ञावर्धन स्तोत्र !! स्वतःच्या जवळचा पाठ त्यांच्याशी जुळवून पाहतांच सर्व प्रकार आण्णासाहेब यांच्या ध्यानांत आला, च मग त्यांस काय वाटले असेल तें त्यांचें त्यांनाच ठाऊक. याविषयींची हकी- गत त्यांनी स्वतःच लिहिली आहे:- - 66 फाल्गुन वद्य प्रतिपदा शके १८४३ चे दिवशीं, पंचमीपासून छापील · प्रतीवरून स्तोत्र म्हणावें, असें मनांत आलें. हा हेतु व छापील प्रतीची अशुद्धता, ही श्रींनीं अप्रार्थित व अचिंतितपणें जाणली व स्तोत्राचा शुद्ध पाठ अशरीर वाणीनें दांडेकर यांस सांगितला. हें श्रींचे ईश्वरत्वाचे प्रमाण...." 66 श्रीसद्गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या प्रत्यक्षतेचें प्रमाण व कृपेचेही हेंच. वे. शा सं. केशव भटजी केळकर हे दाभोळास राहत होते. • त्यांचे घरी दांडेकर निजलें असतां, महाराजांनी त्यांस जागे करून त्यांस स्तोत्र • सांगितलें. शिसपेन्सलीने लिहिले. फक्त शब्द कांनी पडले. दिव्याचा उजेड होता. मला दिलेली प्रत केशव भट केळकर यांच्या भावाच्या हातची आहे. केशवभटजींस पूर्वी श्रींचे दर्शन झाले होते. या स्तोत्राची प्रत दांडेकर यांनी यथाश्रुत लिहून, मजकडे प्रथम फा० व० ५ मी शनिवार दिवशीं । आणून ठेवली. गुडघे गांवाहून कोंकणांतून आणली. या स्तोत्राची प्रत स्व- हस्ताने करून दांडेकर यांस फा० व०१८ मी मंगळवार शके १८१३ या ...