पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० पुढील आयुष्य. त्या दिवशी मंगळवार असून फा० व० प्रतिपदा होती. त्यानंतर ती गोष्ट तितकीच राहिली. " फा० व० ५ शनवार यादिवशी दुपारी अण्णासाहेब यांनी सहज दाराबाहेर डोकावलें, तो त्यांस त्यांचे गुरुबंधु माधवराव दांडेकर ऊर्फ दादा दांडेकर, हे नुकत्याच आलेल्या मुंबईच्या गाडीने येतांना दिसले. औपचारिक गोष्टी झाल्या वर ' कोणीकडे आलांत ? म्हणून त्यांनी दादांना विचारले. तेव्हां त्यांनी असे सांगितलें कीं, “ एकदोन दिवसांपूर्वी, आपण दाभोळ येथें वे० शा० सं० केशव भटजी केळकर यांचें येथें निजलों असतांना आपणांस कोणीतरी जागें करीत आहे असे वाटले. परंतु जागे होऊन पाहतों तों कोणी दिसले नाही. महाराज जागे करीत आहेत असेच वाटलें, परंतु प्रत्यक्ष दिसले नाहीत. मात्र त्यांचे शब्द अतिशय स्पष्टपणें ऐकूं आले. दिसत कोणीच नव्हते, परंतु महाराजांची वाणी होती यांत तिळमात्र शंका नव्हती. " महाराजांनी त्यांस 'ऊठ, मी सांगतों हैं लिहून घे, आणि पुण्यास जाऊन शनवारी दादाला (आण्णासाहेबांना ) दे, ' म्हणून सांगितले. विचारास विशे षशी फुरसतच नसल्यामुळे व महाराजांचे शब्द विनतकार पाळावयाची संवय असल्यामुळे मिणमिण जळणाऱ्या दिव्याच्या उजेडांत शिसपेन्सलीने दादांनी लिहून घेतले. त्यांस लिहिणे वाचणें बेताचेंच असल्यामुळे काय लिहून घेतलें वगैरेही समजले नाहीं. दुसरे दिवशीं केशवभट केळकर यांच्या भावाकडून त्याची प्रत करवून पुण्यास जाण्याच्या विचारास दादा लागले परंतु जावें कसें याची मोठीच पंचाईत पडली. कारण श्रीमहाराजांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन स्वतःच त्यांचे हातांत नारळाची आई दिलेली होती. असो. महाराजांचे शब्द पाळण्याची खटपट करणे आपले काम आहे. पुढे त्यांचे त्यांना ठाऊक असा विचार करून पडशी खांद्यावर टाकून दादा बंदरावर येऊन पोहोंचले. जवळ भाड्यापुरतेही पैसे नव्हते, आतां पुढे काय करावें अशा विचारांत ते होतें, तोंच त्यांच्या परिचयाचे एक गृहस्थ तेथें आलें, व दादांस पाहून मोठ्या आनं दानें, 'दादा, तुम्ही मुंबईस कां जातां आहां ? बरेंच झाले 'माझे आयतेंच मोठे काम झालें, ' असे म्हणाले. त्यावर दादांनी जावयाचें तर आहे पण कसें जावें हाच विचार करतों आहे,' असे सांगितलें, तो गृहस्थ म्हणाला, 'त्याची कशाला चिंता करतां ? मला मुंबईस एका गृहस्थाकडे मोती पोहोचवावयास ,