Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. अप्पासाहेब यांचा मृत्यु. 6 हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ' । यानंतरच्या काळांत म्हणण्यासारखी एकादी मोठी गोष्ट ५।७ वर्षांत कांहीं 'झाली नाही. पुण्यांत त्या वेळेला क्रॉफर्ड प्रकरण, संमतिवयाचें बिल वगैरे पुष्कळ भानगडी चालू होया, आणि त्यांतील कित्येक सूत्रे यांच्याच सल्ल्यानें चालत असत, ही गोष्ट निर्विवाद आहे; परंतु पुढें पडून असा भाग यानीं केव्हांही घेतला नाहीं. मुंबईच्या एकंदर भानगडींत ज्या बड्या बड्या लोकांशी यांचा ऋणानुबंध जुळून आला, त्यांतच सांगलीच्या हल्लीच्या चीफांचे आजे श्री. बाबासाहेब सांगलीकर आणि वडील अप्पासाहेब यांचा ऋणानुबंध जडला. यांपैकी अप्पासाहेबांची तर अण्णासाहेब वर अतीशयच भक्ति होती. अप्पासा- हेव स्वरूपानें अतीशय सुंदर, आणि शरीरानें बलवान् असे असून त्यांचा स्वभाव पराकाष्ठेचा विनीत होता. वाटेल ते करून हिंदुस्तानास लागलेलें ग्रहण सोडवावें, अशा इच्छेने रात्रंदिवस तळमळणाऱ्यांपैकींच हाही थोर पुरुष होता; आणि कदाचित् अप्पासाहेब राहिले असते, तर त्यांना हातीं घेऊन त्यांच्या द्वारे आपल्या पूर्वीच्या खटपटी अण्णासाहेबांना पुन्हा सुरू केल्या असत्या, असा तर्क करण्यास जागा आहे. तशा तऱ्हेचे कांही प्रयत्नही अप्पा- साहेब यांचे सुरू असल्याचा त्यांच्या बोलण्यांत उल्लेख आला होता. या मह कार्य करण्यास लागणारी पात्रता पुरेपूर अंगी असलेला, 'मनुष्याणां सहस्रेषु' असा हा एकच महापुरुष आहे, असे अप्पासाहेबांनी अण्णासाहेबांस पाहतांच ओळखिलें होतें; आणि म्हणून अतिशय शुद्ध अंतःकरणाने आणि नम्नतेनें त्यांचा अनुचर होऊन राहण्यांत, अप्पासाहेब यांस धन्यता वाटे. अशा स्थितीत अप्पासाहेबांसारख्या सच्छील, कर्तृत्ववान्, श्रीमान् गृहस्थाच्या साह्याने पुन्हा काय झाले असते हें क्रांहींच सांगवत नाही. परंतु अण्णासाहेब यांच्या ठरा- विक दैवयोगाप्रमाणे, येथेही काळाने हात दाखविला. अप्पासाहेब हे जितके शूर, तितकेंच अतिशय मानी आणि कोवळ्या अंतः- करणाचे होते. त्यांचें नांव निघालें कीं, अण्णासाहेब नेहमीं अतिशय प्रेमानें- " तो एक देवमाणुस होता,' असे म्हणत असत. काय कारण झाले असेल तें सांगतां येत नाहीं. पण या मानी पुरुषाच्या हृदयास लागून राहणारी अशी कांहीं तरी गोष्ट घडून आली; आणि त्यांच्या अंतःकरणास भयंकर धक्का