पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. अप्पासाहेब यांचा मृत्यु. बसला. तशाच स्थितीत ते धुळ्यास गेले असतां, श्रीनारायणबुवासाहेब यांनी निरोप देतांना, 'तुम्ही आळंदी, पुणे अगर धुळे या तीन ठिकाणाशिवाय इतर कुठें कांही दिवस राहूं नका,' अशी त्यांस स्पष्ट आज्ञा केली. त्यावरून पुण्यास रहावयाचे ठरवून ते पुण्यास आले. त्यांचें नेहमीचें वास्तव्य बाराम- तीस असे. पुण्यास राहण्याकरितां अण्णासाहेब यांच्या सल्ल्यानें मळेकरांचा वाडाही त्यांनी भाड्यानें ठरविला. आतां तेथें रहावयास जावयाचें एवढेच राहिलें. असे असतां एक दिवस अप्पासाहेब हे अण्णासाहेबाकडे आले. आणि उभ्या उभ्या बारामतीस जाऊन येतो म्हणून परवानगी मागूं लागले. त्यांचे कुटुंबही पुण्यासच होतें. हल्लीचे सांगलांचे चीफ हे त्या वेळेस दोन अडीच वर्षांचे असून दुसरें चिरंजीव तर तान्हेच होतें. त्या प्रसंगाचें अण्णा- साहेब यांनी स्वतःच वर्णन एकवेळ केलें:- “ खुर्च्याच्या खोलीत मी बसलो होतों. अप्पासाहेब येऊन उभ्या उभ्या बारामतीस जाऊन येतो म्हणून म्हणूं लागले. त्यांचा गळा दाटून आला होता आणि डोळे पाण्याने भरले होते. तें पाहून, 'अप्पासाहेब, तुम्ही या स्थितींत तरी येथून जाऊं नका, ' म्हणून मी त्यांस सांगितले, आणि त्यांच्या शोकाचेंही कारण विचारले; परंतु ' उभ्या उभ्या जाऊन माझें खाजगी सामान घेऊन येतों,' असे सांगून ते बारामतीस गेलेच. दुसऱ्याच दिवशीं सकाळी तेथून तार आल्यावरून त्यांच्या कुटुंबास घेऊन मी गेलों. एक मूल भाईसाहेबांजवळ होतें, आणि या पिल्लूस (हल्लांचे चीफ) तर मीच हातांत घेतलें आणि जाऊन पोहोंचलों. पाहतों तो अप्पासाहेब यांस गोळीची भयंकर जखम झाली असून ते माझीच वाट पहात होते. मला पाहिल्यावर ते म्हणाले कीं, ' महाराजांच्या कृपेनें सर्व कांही आराम आहे, आणि महाराज दिसतही आहेत. लवकरच मी त्यांचेपाशी जाऊन पोहोंचेन.' नंतर ( बायकोकडे वळून ते म्हणाले ) 'आतां माझ्यासमोर येण्याचें कोणासही कारण नाही. देवाच्या दयेनें तुम्हांस अन्नवस्त्रास वाण नाहीं; काळजीचें कांही कारण नाही.' त्यानंतर महाराजांचें नांव घेत त्यांनीं शांतपणानें देह सोडला. " अप्पासाहेबांच्या मृत्यूनें, अण्णासाहेबांच्या डोक्यांत पुन्हा कांहीं करून पाहण्याची कधीं मध जर उसळी येत असेल तर, तीही येण्याचा संभवच नाहींसा झाला आणि त्यांनी आपणांस तपश्चर्येच्या मार्गास सर्वस्वी वाहून घेतलें.