पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमहाराजांचें निर्याण. चना ? ' त्यावर थोडेसे हंसून ते स्तब्ध राहिले. यावरून पुष्कळ कल्पना मनांत येतात, परंतु त्यांचा विस्तार करावयाचे कारण नाहीं. पुढे भक्त मंड- ळींनी एकत्र होऊन महाराजांचें संस्थान करण्याचा ठराव केला, आणि बापू- साहेब गाडगीळ, बाबासाहेब सांगलीकर, वगैरे बड्या पंचांच्या अनुमतीनें दत्तोपंत आठवले, यांस मागें गादीवर बसवून, हळू हळू मंदिर वगैरे बांधले गेलें. संस्थानची आजची उत्कृष्ट स्थिति सर्वांस माहीतच आहे. अण्णासाहेब हेही, अगदी प्रारंभी नसले तरी कांही काळाने, त्यांत पंच झाले. होते, आणि दत्तोबुवांच्या मागून शंकरबुवांच्या वेळी तर संस्थानची व्यवस्था सारी त्यांच्याच साह्याने चालत असे; परंतु स्वतः यांनी त्या बावतीत मोठा पुढाकार घेऊन कधीं फार भक्ति दाखविली आहे, असे झाले नाही. चार भाविक भक्त जमतात त्यांतीलच एक आपण, त्यांच्याचप्रमाणे दर्शनास येऊन प्रसाद घ्यावा, आणि जावें, असा त्यांचा क्रम होता. स्वतःदेखील त्यांनी महाराजांच्यापुढे कधी मोठी रकम ठेविली आहे, असे कधी झाले नाही. काय जें दहा पांच रुपये ठेवावयाचें तेच इतर लोकांप्रमाणे ठेवावयाचें. महा- राजांस मोठ्या भक्तीनें पूजा विजा बांधण्याच्याही खटाटोपांत ते कधीं पडले नाहीत; परंतु प्रतिवर्षी आपल्या उत्पन्नांतून कमीत कमी १०१ रु. या कामा- कडे खर्च करण्याचा त्यांचा संकेत असल्याचा स्पष्ट उल्लेख सांपडतो; आणि त्याप्रमाणें ते करीतही. परंतु ते महाराजांकडे देण्याच्या रीती मात्र अशा होत्या कीं, कोणासही अखेरपर्यंत ते उमगून आले नाही. स्वतः ठराविक रक्कम दर- साल ठेवून बाकीचे इतरांच्या हातांनीं, आणि आणखीही कांहीं मार्गानीं ते खर्चीत. संस्थानसंबंधी सर्व गोष्टींवर यांचे लक्ष असे, आणि कोणीही यांच्याकडे आला असतां ते त्यास महाराजांचें दर्शन घेऊन येण्यास सांगत.