Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाधीनंतर. ११५ आहे कीं, महाराजांनी डोळे लाल करून मोठ्या रागाचा अविर्भाव आणून स्वतःस समाधीत ठेवण्यास सांगितले, आणि अर्से न केल्यास आपण सर्वांसच 'शापून टाकूं, म्हणून धाक घातला. भोवताली असलेली मंडळीही त्याच बेताची असल्यामुळे, त्यांनी घाबरून जाऊन महाराजांस चटकन् समाधीत ठेवलें, आणि वर दगड बसविला. इकडे बारशाचें जेवण वगैरे आटोपल्यावर अण्णा- साहेब हे श्रीगुंडाचे गणपतीचे दर्शनास गेलं. तेथे त्यांस असे दिसलें कीं, आळंदीच्या बाजूनें तेजाचा मोठा लोळ येऊन तो श्रीगजाननाचे हृदयांत 'शिरला ! त्याच वेळी आळंदीस कांही तरी घोंटाळा झाला, असें ते समजून चुकले. पुढे आळंदीस आल्यावर सर्व प्रकार त्यांस समजून आला; परंतु पुढे कांही न करितां ते शांतपणानें परत आले. ज्याप्रमाणे अण्णासाहेब यांस बो- लावूं धाडलें, त्याप्रमाणेच महाराजांचे सांप्रदायांतील त्या वेळचे अधिकारी • सत्पुरुष यशवंतराव महाराज यांस विचारण्याकरितांही बाळाबुवा नाशकास गेले होते. त्यांनी देखील ' सर्व व्यवस्था होऊन गेली, आतां कार्य त्याचें ? ' असेंच सांगितलें. अण्णासाहेब यांच्या चरित्रांतील पुष्कळशा गूढांप्रमाणेंच हेंही आहे. त्यांस स्पष्ट विचारलें होतें कीं, 'महाराजांना अशा स्थितींत टाकून केवळ बारशा- करतां म्हणून जाणें, तुमच्या स्वभावास धरून नाहीं. असे असतां तुम्ही कसे गेलांत ? ' ' महाराज त्यांची स्वतःची इच्छा असल्याखेरीज कालवश होणें शक्य नाही, अशी तुमची श्रद्धा असतांना, तुझी परत आल्यावर कांहींच कसे केले नाहीत ?' असें विचारतां ते म्हणाले 'महाराजांस आंत ठेवून मंडळींनी तोंड देखील बंद करून घेतलें; तेव्हां मग काय करावयाचें ? त्यांच्या इच्छेपुढें कोणाचा हट्ट चालणार ? म्हणून स्वस्थ बसलों. ' ' तुम्हांस दुःख झाले किंवा ·नाहीं ? ' ते म्हणाले–'छे, त्यांत दुःखाचें काय कारण होतें ? तरीपण भाषण, लठ्ठाउठ्ठी, वगैरेची मौज गेली, एवढ़ें खरें. ' त्यावर मी म्हणालों, 'आतां नाहीं कां भाषण ?' तेव्हां ते म्हणाले –'आतांही आहे, पण ती मौज कांही वेगळी होती. ' त्यावर ' हें तुमचें सांगणें पटत नाहीं, बारशाचें उगीच निमित्त आहे, त्या दिवशीं महाराजांची व तुमची कांही तरी कानगोष्ट होऊन तुम्हांस त्यांनी परत लावलें, जाणि बारशाच्या निमित्तानें तुह्मीं परतला, हेंच खरें. म्हणूनच त्याचें कांही वाटलेही नाहीं, आणि पुढें कांहीं यत्नही तुझीं केला नाहीं, असें-