Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ श्रीमहाराजांचे निर्याण. कृपा केली, येथपर्यंत त्यांच्याविषयी भिन्न भिन्न माहिती सांगणारे लोक सर्वत्र आढळतात. स्वतः अण्णासाहेब यांची श्रद्धा अशी होती की, श्रीगुरुचरित्रांत परमे- श्वराचा नरसिंहसरस्वती म्हणून जो पूर्णावतार झाला, तो अवतार श्रीदत्ता- त्रेयांनी त्या वेळी समाप्त केला नाहीं; श्रीशैल्यपर्वतावर गुप्त होऊन महाराज तेथून हिमालयांत प्रगट झाले, आणि तेथें कांहीं वर्षे राहून यहछेने स्वैरा करीत, नानासोंगांनी आणि नाना रूपांनी जगदुद्धार करीत, कोठें अल्पकाळ तर कोठें बहुत वेळ असे वास्तव्य करून वन्हाड, खानदेश, मालेगांव, पिंपळगांव वगैरे ठिकाणांहून पुण्यास आले. या सर्व कालांत कधीं जटामंडित, तर कधीं शुद्ध मुंडीदंडी वेशानें, आणि केव्हां केव्हां तर फकिरी बाण्यानें हिंडत असल्यामुळे, त्या सर्व माहितीवरून यांचा पूर्व इतिहास कळणे शक्य नाहीं. परंतु तेच हे प्रत्यक्ष होत, अवतार नव्हेत, अशी त्यांची श्रद्धा होती, आणि यांस कोणी नरसिंहसरस्वतीचे अवतार म्हटलेलेही त्यांस रुचत नसे. मात्र इतकेंच की याविषयी त्यांनी कधीही कोणाशी वाद घातला नाही. क्वचित एखादे वेळी थोडेसे उघड बोलत. महाराज हे अक्कलकोट येथील स्वामींचे शिष्य असून महाराजांच्या योगाची पूर्तता अक्कलकोटच्या स्वामींनी केली, असे त्या स्वामांवर भक्ति असणाऱ्या लोकांच्या नेहमीं सांगण्यांत येतें; आणि 'रंडी छोड देव, ' असे म्हणून सिद्धींच्या तडाक्यांतून महाराजांना स्वामींनी वाचविल्याचे त्यांच्या चरित्रांत आहे. 'हैं खरें आहे काय ? ' ' म्हणून एकदां अण्णासाहेबांस प्रश्न केला असतां, त्यांनी ' महाराज अक्कलकोटास राहिले होते, आणि तेथे असतां दोन्हांही स्वामी एकमेकांशी मोठ्या सलोख्याने वागत असत, आणि एकमेकाविषयीं अत्यंत आदर प्रदर्शित करीत असत; त्याच प्रमाणे इतर लोकांचा संपर्क टाळावा म्हणून निवडुंगाच्या फडांवरून उडी मारून निघून जात, आणि तासचे तास परत येत नसत, ' वगैरे गोष्टी खऱ्या असल्याचें सांगितलें. त्यावर “ रंडी छोड देव, ' हे काय आहे ? " म्हणून विचारतां त्यांनी सांगितलें कीं, ‘ तो लोकांनी बसविलेला वेडगळ तर्क आहे. महाराज हे त्यापूर्वी कित्येक वर्षे फक्त संस्कृतच बोलत असत; संस्कृताशिवाय शब्दही न काढण्याच्या या लहरीमुळे लोकांचा फार तोटा होतो, तेव्हां 'संस्कृत भाषा ५