Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमहाराजांचें निर्याण. कृत्वा मानुषविग्रहं द्विजकुले लीलांश्चकाराङ्गताः स्थित्वा गाणगमंडले पुनरगात् श्रीपर्वतस्याटवीम् । त्रातुं स्वीय जनान् अनेकतनुधृक् योऽभूत् क्षितौ पर्यटन् सोऽयं श्रीनरसिंव्हसद्रुवरो नित्योस्त्यलंकापुरे ॥ मद्रासहून आल्यावर यांच्या आयुष्यांतील मोठी गोष्ट म्हटली म्हणजे श्रीनृसिंहसरस्वती यांचे निर्याण ( शके १८०७ पौष शु॥ पौर्णिमा ) ही होय. •बारा वर्षांपूर्वी महाराजांचा व यांचा संबंध जडल्यापासून त्यांच्यावरील यांची भक्ति वाढतच गेली, आणि त्यांचेंही अण्णासाहेब यांजवर विलक्षण प्रेम होतें. महाराज हे कोण कोठील, वगैरे संबंधी प्रत्यक्ष माहिती अशी कोणासच नाहीं. यांचा मूळबांधा मजबूत, धिप्पाड, आणि उंचा पुरा असून, हे आजानुबाहू होते. यांचे लांब हात आणि चेहेऱ्याची ठेवण, व विशेषतः कान, यांवरून पुष्कळ लोक असा वाद घालतात की, हे मूळ महाराष्ट्रीय ब्राह्मण नसून द्राविडी ब्राह्मण असावेत. स्वतः महाराजांच्याविषयी असली माहिती देणारा कोणीही केव्हांच पुढे आला नाही. सबंध हिंदुस्थानभर त्यांनी निरनिराळ्या वेषाने प्रवास केला असल्यामुळे फक्त अमुक ठिकाणी हे होते, आणि अमुक •ठिकाणी यांनी असे केलें, एवढींच सांगणारी मागसें मात्र वाटेल तितकी आढळतात. विद्वत्ता, योगसामर्थ्य, भजनप्रेम, इत्यादि सर्व प्रकारांनी जसा प्रसंग पडेल तसें लोकांपुढे यावयाचें, परंतु आपण त्यांचे काम केले असे मात्र कळू द्यावयाचें नाहीं, या बाबतीत या गुरुशिष्यांचा सारखाच हातखंडा होता. यांची वृत्ति पराकाष्ठेची लीन, आणि स्वभाव विनोदी परंतु, पराकाष्ठेचा गंभीर असल्यामुळे, एकाद्याचें काम करावयाचें, अथवा त्यावर कृपा करा- वयाची, म्हणजे गुरु, गुरुभंधु, अथवा काम पडल्यास शिष्यत्वाचे देखील नात्यानें त्याच्याशी वागून यांनी त्यास शिकवावें. अशा यांच्या वागणुकीमुळे, हे आपल्याच संप्रदायांतले आहेत असे समजणारे, आणि आपणच त्यांच्यावर