Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमहाराज मराठी कां बोलत असत ? ११३ सोडून या, ' म्हणून अंकलकोटच्या स्वामींनी महाराजांना विनंति केली, आणि • तेव्हांपासून महाराज ही मराठी भाषा बोलू लागले. अक्कलकोटाहून पंढरपुरास जाऊन, तेथे ते एक वर्षभर राहिले होते. त्या ठिकाणी आणि पुढे आळंदीस आल्यावरही, वारकरी म्हणूनच ते राहत असत; आणि श्रीज्ञानेश्वरी, नाथभा- गवत, वगैरे प्राकृत ग्रंथांचेंच विवरण करीत. केवळ मौज करण्यापलीकडे संस्कृ तचा उपयोग पुढे त्यांनी केव्हांही केला नाहीं. अशी एक गोष्ट ऐकिवांत आहे की, पंढरपुराहून पुनर्विवाहाच्या वादाक- रितां महाराज पुण्यास आले, परंतु ते येऊन पोहोचण्यापूर्वीच वाद होऊन गेला होता म्हणून ते आळंदीस गेले, आणि तेथेंच राहिले. या गोष्टींत तत्थ्य काय असेल, तें सांगतां येत नाहीं; परंतु कांहीं गोष्टींवरून हा कांहीतरी समज असावा असे वाटतें. महाराज आळंदास आले, त्यावेळी ते जटामंडित असून, आळंदांस वास्तव्य केल्यावर पुन्हा त्यांनी जटा काढविल्या, असे अण्णासाहेब यांच्या सांगण्यांत आले. पंढरपुरास असनांना ते यतिवेषानें होते, हैं उघड आहे. कारण पंढरपुरास त्यांनी एक लक्ष भोजन घातले होतें, व त्या सपाट्यांत त्यांच्या सांगण्यावरून सहस्रभोजन घातलेले लोक परवांपर्यंत प्रत्यक्ष होते. त्यांच्या सांगण्यांत महाराजांचा यतिवेश असल्याचेंच येत होते. त्यावरून पंढरपुराहून ते कोठें तरी हिंडत हिंडत आळंदीस आले, हेंच बरोबर दिसतें. महाराजांच्याविषयीं इतक्या गोष्टी त्यांच्या सांगण्यांत येत, कीं तो एक स्वतंत्र ग्रंथच होईल, थोडक्यांत इतकेंच सांगावयाचें कीं, बारावर्षांतील निकट संबंधामुळे महाराज हेच काय तें जिव्हाळ्याचें स्थान अण्णासाहेबांस झालें होतें. अशा स्थितीत त्यांच्या प्रयाणानें अण्णासाहेबयांस अर्थातच फार दुःख झाले असेल. यांच्या प्रयाणाची हकीगत अशी आहे : - इंद्रायणीचें तीरी श्रीविठ्ठलमंदिर बांधावयास महाराजांनी सुरुवात केली होती. त्याच्या कामाकरितां म्हणून दत्तोपंत आठवले बाहेर गेले होते. महाराजांच्या मनांतून काय असेल तें कोणी सांगावें ? परंतु माडीवरील खोलीत स्वतःस कोंडवून घेऊन, खोलीचें कुलूप कितीही दिवस झाले तरी, आंतून हांक मारल्याखेरीज उघडावयाचें नाहीं, असे त्यांनी बाळावुवा, लक्ष्मणवुवा वगैरेंना कडकपणानें बजावून ठेवलें ८