पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थित्यंतर. अभ्यासांतली गोडपणाची जोड प्रथमतः यांत मुळींच नसल्यामुळे, आणि कृपा आणि अवकृपा या दोन्हीही सारख्याच मानणे भाग असल्यामुळे, त्याचप्रमाणें या शरणागतीस विरुद्ध असलेल्या कर्तृत्वादिक भावना आणि त्यांचे संस्कार घालविण्याची एका बाजूनें अतीशय तीव्र इच्छा, आणि दुसऱ्या बाजूने हा सारा महाराजांचाच खेळ आहे, म्हणून त्यांचा आदर करण्याची आवश्यकता, आणि "ज्या कर्मात कर्तव्याच्या जाणीवे पलांकडे प्रथमतः कोणतीही रसौलत्ति नाही आणि रसोत्पत्तीस जिग्वूनच टाकावयाचें आहे, असल्या तऱ्हेची कर्मनिरतता वगैरे भयंकर युद्ध रात्रंदिवस चालल्यावर, त्या रणभूमीची 'साली निघतील' नाही तर काय होईल ? इतर प्रयत्नांनी ज्या स्थितीवर दुसरे येतात, तीच स्थिति अभ्यासण्यापासूनच आणि हळू हळू त्यामुळेच सर्व तऱ्हेचें अनु- भव येऊन यांचे मार्गक्रमण झाले असल्यामुळें, 'जसे कोणास पटले नाही तसे मला पटले, ' हे त्यांचे म्हणणेही सरळच होतें. अशा रीतीनें 'मनवुद्धीवाचा अंग' हे महाराजांचे आहे. असे धरून त्यांनी प्रारंभ केला, आणि 'देवता घटित जीव व त्याचे शरीर महाराज रूपच झाले' अशी प्रत्यक्ष प्रतीति येण्यांत त्याचें पर्यवसान झाले. हें होत असतां 'परमेश्वरच वस्तुतः मनुष्याकडून साया किया करवितो, परंतु तें त्यास कळत नाहीं, ' वगैरे अनुभव, 'इतरांच्या देहाप्रमाणेंच स्वतःचा देह सदैव भिन्नपणाने पाहण्याची साक्षित्वरूप ज्ञानदशा, आणि 'मनवुद्धी वाचा अंग' यांचें कणशः साक्षित्व, आणि शेवटी स्वतःचेच तर काय, परंतु इतरांचेही ' मनबुद्धीवाचा अंग, महा- · राजरूपच आहेत, अशी ' कणशः ' प्रतीति वगैरे अनुभव त्यांस सहजच आले, असें त्यांच्या कित्येक उल्लेखावरून स्पष्ट दिसतें. आणि म्हणूनच ते इतरांसही उधारीचा मार्ग न सांगतां, अथवा 'गोडवी' 'गोडवी ' कामें न सांगतां, गायत्री महाराजांचें नांव श्रीगुरुचरित्र आणि याच्या जोडीस शरणागति असाच मार्ग सांगत असत. श्रीनृसिंहसरस्वती म्हणजेच परमात्मा असेंच धरून ·चालले पाहिजे, असाही त्यांचा आग्रह नव्हता. 'आम्ही महाराजांच्या पासून प्रारंभ केला, वाटेल तर तुम्ही दुसऱ्या कोठून करा, पण कोणीकडून तरी एत- द्गुण विशिष्ट देव आहे, अशी भावना जागृत करून असे कर्म करा, ' एवढेच त्यांचे कळकळीने सांगणे असे. या सर्व गोष्टी लक्षांत ठेवून त्यांच्या पुढील आयुष्याकडे पाहिले पाहिजे,