Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चित्तशुद्धीची सूक्ष्म कल्पना. १०७. त्यानें घेतला आहे, असेंच अनुभव येऊन मनुष्याची शरणागति घडते. ही सर्वसाधारण रीत दिसते. परंतु जेथें अत्युच्च प्रकारचें कर्तृत्व रोमरोमांतून उसळत असतां, आणि ज्यांत स्वार्थाचा लेश नाही अशा अत्युदात्त ध्येयाने अंतःकरण सारखे तळमळत असतां, आपले सर्वस्व ईश्वरास वाहून आपण केवळ यंत्र बनून रहावयाचें, याच भावनेनें मार्ग चालण्यास सुरुवात होते,. तेथें तें किती तापदायक होत असेल याचा अल्पस्वल्प तरी अनुभव असल्या- खेरीज त्याची कल्पनाही येणे शक्य नाहीं. योगाच्या उन्नत स्थितीमध्ये जस- जसा मनुष्य जास्त जाईल, तसतशी त्याचीं इंद्रियें अतिशय सूक्ष्म आणि तिखट होत जातात, आणि मनोवृत्ती व संस्कारही असेच सूक्ष्मतर, परंतु कल्पनातीत प्रबल होतात. सुखाची संवेदना जितकी तीव्र तितकीच दुःखाची संवेदनाही जवर; आणि अंतःशुद्धी वगैरे गोष्टींची व्याख्याही कडक असते. तुकाराममहाराज घ्या, किंवा कोणी त्या कोटीचे दुसरे घ्या, यांचीं अंतःकरणें मानवी शास्त्रापुरती पाहिली तर अतिशय शुद्धच होती, आणि निग्रह- शक्ति दांडगी असल्यामुळे आपल्या ध्येयास विरुद्ध असलेल्या मनःप्रवृत्ति त्यांस दाबून टाकणेंहि कठीण नव्हते. परंतु या दाबून टाक ण्यानेही त्यांचें काम भागत नाहीं. नुसत्या दावण्याने त्यांचे संस्कार कांहीं जात नाहीत, ते तसेच असतात, आणि त्यांना तर त्या संस्कारांचे नुसतें अस्तित्वही दुःसह होतें; आणि तेवढेदेखील नाहींसें करण्याकरितां जी त्यांची तडफड होते, तिलाच आपण त्यांचे चित्तशुद्धीचे प्रयत्न म्हणून म्हणतो. कीर्ति अथवा लोकेषणा यांचा पगडा श्री तुकाराम महाराज यांच्या चित्तावर केव्हांही नसेल, परंतु तेवढ्याने त्यांचे समाधान होत नव्हते. त्यांना मान दंभ चेष्टा । हे तो सूकराची विष्टा ॥' असे व्हावयास पाहिजे होतें. अण्णासाहेब यांसदेखील पार्थिव वैभवाची किंमत केव्हांही वाटली नाहीं. “ इंद्राचें जरी वैभव कोणी देऊं म्हणेल, तर मी त्यास सांगेन की, 'बाबारे, तुझे काय काम असेल तें मी करतों, तें वैभव मात्र मला नको, तें तूंच उपभोग' असे सांगेन,' असे ते म्हणत. एकदां म्युनिसिपालिटीत काम करीत असतां एका गृहस्थाच्या कामासंबंधानें मत द्यावयाचें होतें. त्या गृहस्थास यांनीं मत देण्याचें कवूल केलें होतें आणि त्याचा प्रतिपक्ष अन्यायी आहे अशी यांची खात्री होती. परंतु म्युनिसिपालिटी, कडून त्या प्रतिपक्षाच्या लोकांना ते काम गफलतीनें करून घ्यावयाचे होतें. (