Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थित्यंतर. इतरही या मार्गातले लोक आळसून गेलेले दिसतात, त्यांना यावरून पुष्कळ शिकतां येईल. स्वतः अण्णासाहेब यांच्याकडे पाहिले तर अभय, सत्वसंशुद्धि दान, वगैरे दैवी गुणसंपत्ति तेथें ओतप्रोत होती, आणि बाहेरील आयुष्य परोपकार, वैद्यकी, सार्वजनिक कामें, पोटाचा उद्योग, व स्नानसंध्या, देवदर्शन, प्रदक्षिणा घालणें, पोथी वाचणें वगैरे क्रियाकरण्यांत जात असे. उत्तर आयुष्यांत प्रापंचिक अड. चणी त्यांच्यावर पुष्कळच आल्या, आणि मृत्युसारखे घालेही बरेच पडले. परंतु त्यासर्वांना न जुमानण्याइतकी निःसंगता त्यांचेजवळ उपजतच होती. आणि हैद्राबाद वगैरे प्रकरणांतील फसगतीमुळेही आपण डगमगलों नाहीं, असें त्यांनीच स्पष्ट सांगितलें होतें. तेव्हां 'अंगाची सालटी निघाली' या शब्दाचा अर्थ काय असावा, हे लक्षांत येत नाही. महाराज हा शब्द त्यांच्या भाषेत ' दयाज्ञानगुणसागर ' सर्वकर्ता, सर्वव्यापी, आणि सर्वज्ञ अशा परमा- त्म्याचा वाचकच होऊन बसला होता, व श्रीनृसिंहसरस्वती महाराज आणि तो परमात्मा एकच, अशी त्यांच्या मनाची स्थिति होती. ' अशी खात्री तुमची कशी झाली ? ' असा प्रश्न केल्यावरून त्यांनी सांगितले की, ' ती हळू हळू झाली, आणि तो परमात्मा सर्व कांही करतो, आणि तो दयाळू आहे, असे सम- जलें. ' ' वासनेचा उत्पादक तोच आहे. आपण त्याची निरिच्छपणें सेवा करावी, आपल्या वासना सुवासना करून त्या सिद्धीस नेणें, त्याचेकडेच आहे' अशा प्रकारच्या भावावर ते आले; आणि असे होतांना त्यांस कांही कमी क्लेश पडले असतील असे नाहीं. मुरल्यावर लानतेचा इतका मधुर रस आंत असलेल्या या अमृतफलांत, प्रथमतः कर्तृत्वाची ऊर्मी अतीशयच टणक असली पाहिजे. ही ऊर्मी जिरवावयासच त्यांना सर्वांमध्ये अधिक क्लेश पडले असतील. या अहंकृतीची जाणीव देखील, आणि तीहि पुन्हा सामान्य माणसाप्रमाणें सर्वक्रिया अतीशय अभिनिवेशानें करीत असतां पुसून टाकण्याच्या या खटाटोपासच 'सालटी' असें नांव दिलें असावें असें वाटतें. साधारणतः दुसरें प्रयत्न करीत असतां, त्यांत जी गोडी उत्पन्न होते तिच्याच जोरावर उत्पन्न झालेल्या समाधान वृत्तीमुळे, हळू हळू ' सर्व देव करतो' असें वाटणे, हैं साहजिक आहे; आणि अभ्यासकाळी तरी असे व्हावयास देवाच्या कर्तृत्वाचें गोडच अनुभव येतात, म्हणजे त्याची आपल्यावर कृपा आहे, आणि सर्व भार