पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ स्थित्यंतर. त्यामुळे सभेत कांहीं विषयावर हे दुसऱ्याची समजूत घालीत असतां गडबडीनें ते प्रकरण काढून ' सर्वांची अनुमति आहे ना ? ' असे त्या पक्षाच्या एका गृहस्थाने विचारलें. अत्यंत सावधानता असलेल्या अण्णासाहेबांनीही बोलण्याच्या गडबडीत कांही तरी गैरसमज होऊन 'हो' म्हणून मान डोलविली, आणि बाकीच्यांच्या अनुमोदनाने त्याचा निकालही लागला. अण्णासाहेब आपले काम करणार म्हणून तो गृहस्थही हजर नव्हता. अण्णासाहेब यांच्याही ती गोष्ट -लक्षांत न येतांना ते तसेच घरीं आले. पुढे जेव्हां तो गृहस्थ येऊन त्यानें आठवण दिली, तेव्हां सर्व प्रकार लक्षांत येऊन या कामांत जितकें सावध राहावयास पाहिजे होतें, तितकें न राहिल्यामुळे आपल्या हातून दोष घडला खरा, असे वाटून त्यांच्या मनास दुःख झाले. आपल्याकडून आपण दोष करूं नये, मग दुसऱ्यास त्याचें कांहीही चाटो, असे त्यांचें वागणें असे. येथें आपल्याकडूनच दोष घडला, असे वाटून त्यांस खेद होऊं लागला. रात्रों श्रीगजाननाचे दर्शनांस जात असतां पायाखालची वाट असतांही, रस्त्यावरील खडीस अडखळून ते पडले, आणि गुडध्यास वगैरेही लागले. रस्त्यावरील एका माणसानें- ' कोण अण्णासाहेब कां ? ' असे म्हणून त्यांना उठविलें, आणि 'पागोटें वगैरे आणून झटकून दिले, व लागल्याबद्दल खेद प्रदर्शित केला. परंतु अण्णासाहेब सांगत ' माझ्या मात्र अंतःकरणांतील सारा खेद नाहीसा होऊन उलट मोठा आनंद झाला. ' आपल्या हलगर्जीपणाचें प्रायश्चित्त लागच्या लगेच महाराजांनी दिलें, ही त्यांची केवढी कृपा ! ' असें मनांत येऊन त्यांना मोठा आनंद झाला. तसेंच एकदां कोठलेंसें कवठ पडलेलें मालकास न विचारतां उचलून आणून त्यांच्या बरोबरील मुलांनी ओंकारेश्वरावर खाण्याचा विचार कैला. ‘ कसली गडबड आहे रे ? ' म्हणून रस्त्यांत त्यांनी विचारलेंही, परंतु कवठाची हकीगत कळल्यावर त्यांचे तिकडे विशेष लक्ष गेलें नाहीं. ओंकारे- श्वरावर आल्यावर त्यांना असे वाटले की पाठीस कांहीं तरी बोंचतें आहे. म्हणून त्यांनी पहावयास सांगितलें. पहातात तो एक गांधिलमाशी तेथें बसून दंश करीत आहे ! त्या वेळी रात्रीचे दोन वाजले होते. अशा वेळीं अंगरखा आणि सद्रा यांच्या आंत माशी गेली तरी कशी ? याचेंच सर्वांस नवल वाटलें.