पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चित्तशुद्धीची आवश्यकता. १०५ / आणावयाचा कोठून ? परंतु ही शंका व्यर्थ आहे. भाविकपणा म्हणजे या ग्रंथानें काम खास होईल अथवा त्या ग्रंथांतील विशिष्ट देवतेचें माहात्म्य असा जर अर्थ घेतला तर कांहींच होणार नाही. कारण अनुभवाशिवाय तसा भाविकपणा येणार नाही, आणि अनुभव हें तर साध्य आहे. तेव्हां हें कसें जुळणा ? त्याचा अर्थ असा आहे की भाविक मनुष्याची ज्या तऱ्हेची चित्ताची धारणा असते, त्या तऱ्हेची धारणा तें कर्म करतांना तरी अखंड ठेवली पाहिजे. परंतु चित्तशुद्धीची गोष्ट काढली की, या मोठ्या लोकांच्या कपाळास तिडीक उठते. कारण एक तर यांची चित्त नेहमीं शुद्धच असतात! आणि दुसरें, तिच्या प्रयत्नाकरितां रात्रंदिवस वाटेल तसे क्लेश आणि झीज सोसून संग्राम करावा लागतो. त्यापेक्षां योगाभ्यासाचा सर्वच गूढ प्रकार बरा ! आतां यावर असेही वाटण्याचा संभव आहे की, नामस्मरण अथवा योगादिअभ्यास यांनीच चित्तशुद्धि कां होऊं नये ! तर कदाचित् त्यांनीही होणें शक्य आहे, परंतु ' पुष्कळच काळ सतत नांव घ्यावें, तेव्हां कुठें कांहीं होतें, ' असे अण्णासाहेब सांगत असत. 'छंद या नामाचा ' घेणारे श्रीतुकाराम महाराजच त्या बरोबरच ' काय करूं मन अनावर' अशा तळमळीनें प्रत्यक्ष कांद्याची माळ गळ्यांत घालून शामकर्णावरून मिरवून घेण्यापर्यंत कृति चित्तशुद्धीकरितां करित होते. अनेक प्रकारच्या योगयुक्तथा सांगिल्यावरही श्रीमहाराजांनी शेवटी सत्य, क्षमा, दया, शांति' हीच 'योगयुक्ति' आहे, 'परिसावी ' म्हणून सांगितले आहे. 6 सारांश काय, कित्येक लोक योगाभ्यासाच्या गोड आणि विचित्र कल्पनांमुळे आणि कित्येक अशा कांहीं शाळेत स्वतःस न घालून घेतां, नुसत्या नामाचा अथवा ग्रंथाचा थोडे दिवस अट्टाहास करून, ' यांत काय आहे ? दगडाचें पॅव,' असे म्हणून त्याची निंदा करण्यास प्रवृत्त होतात. परंतु जर या साधनांच्या योगानें अध्यात्मिक अवस्था मिळविणें असेल, तर त्यांना सातत्य आणि चित्तशुद्धि यांची जोड असलीच पाहिजे. असे असले तर जें कांही दुसऱ्या कोणच्याही अभ्यासानें होतें, तें सर्व यानें होतें, असें ते ठांसून सांगत असत आणि अनु- भवाशिवाय कोणचीही गोष्ट कोणास करावयास सांगावयाची नाही, असा त्यांचा धारा होता. यावरून काय अनुमान निघतें, तें ज्याचें त्यानें काढावें. असल्या कांही समजुतीमुळे त्यांनी कोणास कांही करावयास सांगितलेलें, अथवा