पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ स्थित्यंतर. आणि असे असून ही आपल्या कल्याणाची खरोखर कळकळ असते, ( नुसती औपचारिक नव्हे ! ) त्याला महाजन असे म्हणून त्याच्या मागून जावे. या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाहिले असतां, ते स्वतःच महाजन होते आणि लोकांच्या कल्याणाच्या कळकळीने त्यांचें अंतःकरण अक्षरशः तुटत असे; अशा कारुणिकतेने सांगितलेल्या शब्दांना उडवाउडवीत काढणाऱ्या महात्म्यांच्या साहसाची कमाल होय ! जणुं काय, 'बघ अखेरीस मी तुला किती सोळा आणे फसविलें!' असें देहावसान समयीं पाठीवर थाप मारून जगास सांगतां यावें, एवढंच त्यांचे ध्येय होतें एका गृहस्थास श्रीगुरुचरित्र वाचावयास सांगितले असतां तें त्याच्या मनांत भरत नाही असे पाहून अण्णासाहेब त्यास अत्यंत कळकळीने म्हणाले – ' माझ्या मनांतून तुमचें काम करावयाचें नाहीं, म्हणून मी काहीं तरी टाळाटाळी करतों, असे समजूं नका. तुमच्या कल्याणाची गोष्ट सांगतों, श्रीगुरुचरित्राचीं पारायणें प्रथम करा, त्यांत तुमचें हित आहे. ' योग असो अथवा कोणचाही मार्ग असो, जरी एवढा तेवढा चटका कित्येक कारणामुळे, कोणास लागतो, अथवा कांहीं अनुभव येऊन जातात, तरी कोण- च्याही मार्गानें खरोखर पुढे पाऊल पडण्यास, आणि त्या मार्गाचा कांहीं फायदा अढळ स्थितीने मिळण्यास चित्तशुद्धिच आड येते, असा आजपर्यंतचा सर्व प्राप्त पुरुषांचा आणि शास्त्राचा अनुभव आहे. आणि कोणचाही अभ्यास करीत असतां त्याच्या जोडीस अथवा केव्हां तरी एकदां चित्तशुद्धीचा स्वतंत्र प्रयत्न करावाच लागतो, असे दिसून येतें. मग तो प्रयत्न जाणून बुजून केलेला असो, अथवा परिस्थितीची कानस लागल्यामुळे नकळत घडलेला असो. अशा स्थितींत गायली वगैरेच्या मार्गात तर त्याची अत्यंतच आवश्यकता आहे, आणि ही गोष्ट लक्षांत न घेतां नामस्मरणानें आणि गायत्रीनें अथवा श्री गुरुचरित्रानें कांहीं होत नाही म्हणून त्यांच्यावर तोंडसुख घेणारा मनुष्य म्हणजे पूर्वांगाच्या तयारीशिवाय, योगाच्या उत्तरांगाची सिद्धि मिळविण्याचा वृथा हट्ट करणारा दुरभिमानी होय. श्रीगुरुचरित्रादिक ग्रंथांत ' भाविकांस प्राप्ती होईल' म्हणून सर्वत्र लिहिलेले आढळतें, आणि त्यावरुन अशी शंका येते कीं भाविकपणा असल्यावर तर वाटेल तसें काम होईल भाविकपणा

  • हे गृहस्थ म्हणजे मननामोदकार रा. माधव गोविंद भिडे हे होत.