पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाजन कोण ? १०३ • हा प्रश्न उपस्थित करून त्याची चर्चा करण्याचें मुद्दाम कारण एवढेंच कीं, वस्तुतः याविषयीं अण्णासाहेबांची माहिती त्यांच्या तोंडून कोणास कळली आहे, असे खात्रीपूर्वक मानतां येत नाही. अशा स्थितीत अभ्यास वगैरेंचें बंड माजविणारे लोक त्यांच्या प्रतिष्ठित तर्कांनी वस्तुतः अण्णासाहेब यांनी उघड उघड जें केले, त्याचेही महत्त्व घालवून टाकतात. 'नुसत्या नामस्मरणादिकांनी काय व्हावयाचे आहे ? " गायत्रीच्या योगानें फार तर सामर्थ्य येईल. पण योगदशा थोडीच मिळणार आहे ? " गुरुचरित्रांत भाविक भजनापलीकडे, अथवा कोणास पैसा दे, कोणास पोर दे, अशा पलीकडे कांहींच नाही. त्याच्या नुसत्या वाचनानें काय व्हावयाचें आहे ? “ वो नाम तो कुछ और है' अशा प्रकारच्या वादविवादांनीं बुद्धीभेद करणारे, आणि वस्तुतः कोणत्याही तऱ्हेचा प्रत्यक्ष अनुभव न घेतां, एकदम पूर्णावस्थेतील माणसाप्रमाणे सर्व मार्गांचं आणि गोष्टींचे रहस्य आपणास समजते, अशा आत्मसंभावनेनें वाटेल त्या विषयावर निःसंकोचपणे जीभ टाळूस लावणारे वडे लोक " अण्णासाहे- वाचा खरोखर मार्ग वेगळा होता, कोणीही आला तर त्यास 'महाराजांवर विश्वास ठेव, गायत्रीचा जप कर, महाराजांचें नांव घे, गुरुचरित्र वाच ' म्हणून सांगत ती केवळ उडवाउडवी होय, खरा मार्ग तर कांहीं वेगळाच आहे, " असे म्हणतांना सर्वत्र आढळतात. त्यामुळे 'परमार्थ म्हणजे लांकूड होऊन पडणें नव्हे, परमार्थ म्हणजे चमत्कार पाहणें अथवा दाखविणें नव्हे, परमार्थ म्हणजे चित्तशुद्धि, आणि चित्तशुद्धि म्हणजे अवंचकता, निःस्वार्थता आणिं निरहंमति' हैं जें त्यांनी आपल्या कृतीने आणि वाणीनें रात्रंदिवस कंठशोष करून सांगि- तले, त्याच्यावर पाणी पडण्याची वेळ येते. 'ज्याचा भला अनुभव नाहीं, तें मी कधीं कोणास सांगत नाहीं, ' असें तें नेहमीं म्हणत आणि त्याप्रमाणे तशा गोष्टी सांगतांना ' अमका अमका असे म्हणत होता, ' अशा तऱ्हेनें सांग- ण्याचा त्यांचा परिपाठ होता. बरें, ते स्वतः महाजन होते. भारतांत धर्म- राजांनी ' मार्ग कोणता ? ' या प्रश्नास ' महाजनो येन गतः स पंथा' असे उत्तर दिले आहे. त्यावरून 'महाजन कोणास समजावें, आणि कोणाच्या मागून गले असतां निदान घात तरी होणार नाहीं, ' असा प्रश्न केल्यावरून त्यांनी सांगितले होतें कीं ' जो स्वतः बोलल्याप्रमाणें तंतोतंत वागतो, ज्याला आपल्या- पासून यत्किंचितही म्हणजे नुसतें बरें म्हणवून घेण्याचीसुद्धां इच्छा नसतें,