Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ स्थित्यंतर. पद्धतींत अमनस्कास साघनीभूत असा महाराजांनी सांगितलेला योगाभ्यासाची रहस्यें असलेला एक ग्रंथ आहे. या ग्रंथांतील अभ्यास आपण करतों, असें सांगणारे कांहीं सांप्रदायिक आहेत; व त्यांतीलच एक अभ्यास अण्णासाहेब यांचा होता, तो आपणास ठाऊक आहे, असे बोलून ते गूडपणाच्या मंडपांत दुस-याची वाढती जिज्ञासा झांकून टाकतात. परंतु हा ग्रंथ माहीत असणा-या सांप्रदायिकांना हे माहीत आहेच की, यांतील सर्व अभ्यासक्रम हे शरीरास ताटस्थ्य अथवा सुषुप्ती आणणारे आहेत. त्याचप्रमाणे त्या मार्गांनी पुढे पाऊल खरोखर पडण्यास कमीत कमी चार घटका तरी अभ्यासाची स्थिरता झाली पाहिजे, आणि अशा रीतीने अभ्यास करणारास, बाकीच्या व्यवसायांची अनु- कूलता आणि आहारविहार यांची नियमितता पाहिजे. राजयोग अथवा हठ- योग या पद्धतीने जाणाऱ्यास प्रथमतः तरी कालनियमांचे परिपालन करणे अवश्य आहे, आणि कालनियम व अण्णासाहेब यांचा तर उभा दावा ! अण्णासाहेब यांच्या संबंध जीवनक्रमांत काल म्हणून कांही खंडशः ओळखली जाणारी वस्तु आहे, याची त्यांस जाणीव असावी असेंही दिसत नाही. त्यांचा सर्व काल त्यांच्या कर्माच्या अखंडतेंत होता. त्याचप्रमाणे वर सांगितलेंच आहे कीं दोनदोन चारचार दिवसांतही त्यांना कधीं कोणी निजलेले पाहिले. नाहीं, आणि त्यानंतरही जेव्हां निजावयास सांपडे, तेव्हां कर्धी तास दीड तासाच्या वर ते निजले नाहीत. यावरून हे अभ्यास अण्णासाहेब यांनी कसें केले असतील, हें या माहितगार लोकांनीच सांगावें. तसेंच, हीच त्यांची तन्हा पूर्वीपासून देखील अशीच होती. उलट पूर्वी देवास जाणे, प्रदक्षिणा घालणें वगैरे शारीरिक मेहनतीची कामें जास्त जोरानें चालत. यावरूनही अण्णासाहेब यांचा अभ्यास या पैकींच असून ' आम्हांस ठाऊक आहे' असे म्हणणाऱ्या लोकांस, काय म्हणावें, हें कळत नाही. असो. हे विषयांतर टाकून त्यांचा जीवनक्रम आणि केव्हां केव्हां निघालेले उद्गार यांवरून सरळ अनुमान काय. निघतें तें पाहूं. असें स्पष्टपणें लिहिण्यांत कोणाचाही उपमर्द करण्याची, अथवा ते विश्वास पात्र नाहीत असे म्हणण्याची इच्छा नाहीं. उलट व्यक्ती- प्रत तसा तसा रंग करण्याची त्यांची हातोटी अपूर्व असल्यामुळे, त्यांना तसें वाटलेंही असेल. आमचें म्हणणे एवढेच आहे की, त्या वाटण्यास इतर सर्व गोष्टींची संगती जुळते किंवा नाहीं, हें त्यांनी पाहिले नाहीं.