पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

S सांप्रदायिक अभ्यासपद्धति. १०१ पाठीची साली निघाली त्या करितां ! ' हें ऐकून मी तर विचारांत पडलों. कारण साधुसंत नुसतें नामधारी का होईनात, अण्णासाहेबांस अतीशय पूज्य. मग खरोखरच जे अधिकारी पुरुष होऊन गेले, त्यांच्याविषयीं तर बोला- वयासच नको. श्रीनरसिंह सरस्वती यांचे पट्टशिष्य धुळ्याचे नारायणबुवा ऊर्फ पद्मनाभ स्वामी यांच्याविषयीं ते नेहमीं म्हणत की, " असा संत मला अर्ध्या हिंदुस्थानांत दिसत नाहीं; कारण मी आणि माझें हें कधीं त्यांच्या तोंडून चुकून देखील निघालें नाहीं. यच्चयावत् सर्व गोष्टी महाराज करतात, असे त्यांस वाटे ? या बुवासाहेबांस ते महाराजस्वरूप समजून तसाच मान देत. तेव्हां त्यांच्या पेक्षां देखील आपला अनुभव आणि श्रद्धा अधिक आहे, असे अण्णासाहेब यांनी म्हणणे, मला शक्यच वाटेना. बरें, 'सालटी निघाली ' म्हणावें, तर वातांबुपर्णाशन करून हाडाचीं कार्डे करणारे आणि “ देवाच्या पायाकरितां ' श्रीतुकोबासारखें 'सर्वस्वाची होळी करणारेही कांही त; तेव्हां यांचींच अशीं काय ' सालटी निघालीं ? ' असे इत- रांस कमीपणा आणणारे प्राकृत जनासच शोभणारे शब्द अण्णासाहेब खास चोलणार नाहीत. अशा शंकेनें विचार करीत असतां बरेच दिवस गेले. पुन्हा त्यांनाच विचारावयाची तर सोयच नव्हती. परंतु असें वाटे की, या शब्दांचा अर्थ आपणास नीट लागत नाही. असे होतां होतां त्यांच्याच कांही बोलण्या- वरून एकदम त्याचा अर्थ उलगडला. मला जसे पटलें' म्हणजे 'मला ज्या रीतीनें पटले, ' असा या स्थितप्रज्ञतेच्या मार्गावर जोर होता. १ एकदां महाराजांनी कोणास काय अभ्यास सांगितले अशा विषयीं बोलणें चाललें असतां ' अमक्यास ध्यानयोग सांगितला, ' ' तमक्यास अक्षरसाक्षित्व सांगितले, ' ' बुवासाहेबांस हठयोगाच्या पद्धतीने पूर्णतेस नेलें, अमक्याची अभ्यासपद्धती अशी होती, ' असा विषय निघाला. तेव्हां मधेच ' महाराजांनी कोणास कांहीं, कोणास कांहीं, असें सर्वांस सांगितलें, परंतु तुम्हाला मात्र कांहीच सांगितलें नाहीं ? असा प्रश्न त्यांना करण्यांत आला. त्या वेळी कांही एक न बोलतां ते उगाच राहिले. असा प्रश्न निघाला असतां ते नेहमींच स्तब्ध रहात. परंतु एरवी कित्येक वेळां ' पाहिला गे माय, तो मी देवा- चाही देव । फिटला संदेह निमालें दुजेपण, ' असे मात्र अतिशय आनंदानें म्हणत. याच ठिकाणी दुसरीही गोष्ट उघड सांगावीशी वाटते. सांप्रदायिक 26