पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० स्थित्यंतर. साहेबच 'माझे स्वतःचें काय व्हावयाचें आहे ? हें सारें तुमच्याकरितां करतों' म्हणून वामनास म्हणाले होते. आतां मुख्य प्रश्नाचा विचार करूं. ज्याला थोडी तरी पारमार्थिक दृष्टी आहे, असा कोणीही मनुष्य अण्णासाहेबांच्या सहवासांत राहून सूक्ष्म दृष्टीनें त्यांच्याकडे पाहूं लागला, तर त्यास एक गोष्ट निश्चित वाटत असे. 'असा पुरुष परमार्थसोपानाच्या मधे असणे शक्यच नाही. एक तर वर जाऊन स्वस्थ बसलेला असेल, अथवा त्याने मुळी पाहिरीच ओलांडली नसेल, ' असे त्याच्या मनांत आल्यावांचून रहात नसे. त्यांच्यासारखा प्रामाणिक, वैराग्य- संपन्न आणि साक्षेपी पुरुष साधक-दशेंत असतां जसा वागावयास पाहिजे, असें त्यांच्या वागण्यांत कधीच कांही नसे. म्हणजे संशय, व्याकुळता, अट्टाहास वगैरे साधकांच्या वृत्तींत अवश्य अपरिहार्य असलेले तुफान 'कधींही त्यांच्या ठिकाणी आढळले नाहीं. मोठमोठे खडक फोडून आपणास कोणीकडे जावयाचें आहे, हे ठाऊक नसल्यामुळेच जणूं काय वाटेल तशा वेड्यावांकड्या उड्या टाकीत, अडखळत, धडपडत, आणि इकडे तिकडे भट- कत जाऊन, शेवटी कसा तरी एकदां समुद्र गांठणाऱ्या एकाद्या नर्मदेप्रमाणें त्यांचे पुढील आयुष्य नसून, आपली दिशा आणि विश्रांतिस्थल ठाऊक अस लेल्या आणि शांतपणानें कोणच्याही तऱ्हेची खळखळ न करितां, अगाध जल- समूह घेऊन उभयक्षेवें पावन करीत संथपणानें अव्याहत वाहणाऱ्या पुण्यस- लिला भागीरथीप्रमाणे त्यांच्या आयुष्याचा ओघ एकजात आणि एकतंत्री दिसतो. त्यांच्या वर्तनाकडे पहावें तर, सर्व प्रकारच्या विरोधांचे बेमालूम

  • वामन दातीर हा अण्णासाहेब यांच्या भाचीचा मुलगा हा सेकंड क्लास

इंजिनिअरची परीक्षा पास होऊन पुणे येथे शिवाजी मेटल वर्क्समध्ये एंजि- निअर होता. अण्णासाहेब यांचे येथेंच राहात असे. भुईमुगाचे दाणे खाऊन रहावें, व नित्य श्रीगुरुचरित्राचा सप्ताह करावा असा याचा नेम होता. अण्णा- साहेब यांचा याच्यावर मोठा लोभ होता. त्याचीही त्यांचे ठिकाणी एकनिष्ठ भक्ति होती. तो १९१४ चे डिसेंबरांत न्युमोनियानें वारला. याच्या इतका सरळ स्वभावाचा भट्टभड्या मनुष्य सांपडणें कठीण. अण्णासाहेब तर याला श्रीमद्दा- राजांचें बालरूपच समजत.