Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अण्णासाहेब-एक कोडे ! ८९ , काढणाच्या भोळवट म्हातारीप्रमाणे नृसिंहसरस्वतींनीं भारून टाकल्यामुळे वायां गेलेले सज्जन पुरुष होते " येथपर्यंत सर्व प्रकारच्या श्रद्धा बाळगणारे लोक सांपडतात. परंतु सामान्य समजूत जर त्यांच्याविषयी पाहिली, तर अण्णा- साहेब हैं एक मोठें कोडें असून तें उकलणे कठीण आहे, अशीच आहे; आणि हें कोडें उकलण्याचा प्रयत्न निरनिराळ्या श्रद्धावान् लोकांना आपापल्या दृष्टी- प्रमाणें मूर्खपणाचा वाटतो. ' हे एक वायां गेलेले वेडपुरुष होते, ' असें समजणाच्या लोकांस इतकेंच सांगतां येईल कीं, ही तुमची समजूत प्रत्यक्ष अनुभवास धरून नाही. कारण त्यांचा प्रत्यक्ष सहवास आणि भाषणादिकांचा अनुभव घेणारांना जरी ते काय होते हैं ठरवितां आलें नाहीं, तरी ते वायां गेलेले पुरुष आहेत, असे वाटणेंही शक्य नव्हते. कारण ग्रंथलेखनाची अगर अलीकडच्या पद्धतीनें एकादी संस्था काढण्याची बाब जर सोडून दिली, तर व्यावहारिक रितीनें कां होईना, दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याकरितां दिवसाचे जवळ जवळ २४ ही तास खर्चल्याचे त्यांच्यासारखे दुसरें उदाहरण सांपडणार नाहीं; आणि हा मोठेपणा कांही कमी नाहीं. बरें, या लोकांस पारलौकिक दृष्टीच नसल्यामुळे यांच्या दृष्टीने इतर कशांत मोठेपणाही असणे शक्य नाहीं; आणि तशा लोकांकरितां हा पुढील भाग नाहीं. ज्यांना ते केवळ ज्ञानविग्रह अवतार असून त्यांची सारीच लीला मायिक आहे, असे वाटत असेल, त्यांना हा प्रयत्न पाहून, 'काय हा मूर्खपणा ? मोठे आले लिहिणारे ! ' असें वाटेल आणि तेंहि साहजिकच आहे; कारण ईश्वराचें खरें वर्णन म्हणजे वाचा बसणें हेंच होय. जे सर्वांच्याच अतीत आहे, त्याचा विचार मनुष्यानें आपल्या अणु- माल अकलेने काय करावयाचा, आणि त्याचा कार्यकारणभाव अथवा संगति तरी काय बसवावयाची ? यावर आमचें इतकेंच म्हणणे आहे कीं, वस्तुतः हें जरी खरे असले तरी ईश्वर जी लीला करतो, ती त्याला स्वतःला कांही प्राप्य आहे. म्हणून नव्हे तर ती आमच्या उपयोगाकरितांच करतो. आणि म्हणूनच तो आपली लीला कार्यकारणादि सृष्ट परंपरेस धरूनच करतो. आणि ती आप- गास शिकविण्याकरितां असल्यामुळे त्यांतील अतिमानुषभाव पोटांत ठेवून, जर आपण तिचा अभ्यास केला, तरच त्याचा हेतु यथाशक्ति तडीस नेण्याचे आपले कर्तव्य आपण केलें असें होईल; याच दृष्टीनें केवळ हा भाग लिहा- वयास घेतला आहे; आणि ऐं प्रत्यक्ष प्रमाणास धरूनच आहे. स्वतां अण्णा-