पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अवीट सहजस्थिति, एकीकरण असल्याचें असें दुसरें उदाहरण सांपडणे कठीण. अतिशय अनियमि तता व कठोर नेमनिष्ठता ही त्यांच्याइतकी उत्कृष्ट कोठेंच पहावयास सांपडा- वयाची नाहीं. निरंतर योग स्थितीत असलेली तनु, भक्तीचा जिव्हाळा, ज्ञानाचे वैभव, आणि तपश्चर्येचें भाग्य यांचा अपूर्व संगम तेथें होता. निरहंकारतेच्या पराकाष्ठेमुळे स्वाभिमानतेचा आविर्भाव त्यांच्या सर्व कृतींत इतका होता की डोळ्यांत तेल घालून पाहणाऱ्याचीही दिशाभूल होऊन जावी. याच्या उलट पहावें तर कधीं एकादी गोष्ट मी केली, अथवा मी करीन असे त्यांच्या मनास शिवत असल्याचीही कल्पना कधीं कोणास व्हावयाची नाही. हिंदुस्थान देश स्वतंत्र व्हावा. वैदिक धर्माचें क्लैव्य नाहींसें होऊन त्याचें वीर्य पूर्ण प्रगट व्हावें, म्हणून रात्रंदिवस तळमळत असल्यामुळे त्याला अनुसरून क्लेश द्वेष, तिटकारा, शोकसंताप, मीं तूं पणा, यांच्या जोडीस दुसऱ्या बाजूने पहावें, तो 'अद्वेष्टय सर्व भूतानां ' वगैरे प्राप्त पुरुषाची लक्षणे जशीच्या तशींच लावून ध्या-असा सर्व तऱ्हेनें विचार केला असतां इतक्या सहज स्थितीत साधकावस्था अथवा खरें बोलावयाचें म्हणजे साधकावस्थेत अशी सहज स्थिति असणे अशक्य आहे. मग सामान्य अज्ञदशा तर दूरच राहिली. केवळ अज्ञ मनुष्य देखील सज्जनपणा वगैरे साधुगुणांत उच्च कोटीचें वर्तन करूं शकेल आणि तशी औदार्य, परोपकार वगैरे गुणांनी युक्त सज्जन माणसे असतातही. परंतु सर्व प्रकारच्या तीव्र विरोधांत अवांट सहज स्थिति असणे ही गोष्ट असाध्य आहे; आणि या दृष्टीने पाहिले तर हे प्राप्त पुरुष होते, अशीच खात्री होते. इतकेंच नव्हे तर चमत्काराच्या वगैरे सपाट्यांत न सांपडलेला आणि स्वतःचे सामर्थ्य व अनुभव यांचे प्रदर्शन, वात्सल्य, करुणा, इत्यादि सद्विकारांच्यामुळेच कां होईना, कर- ण्याच्या मोहांत थोडे देखील न सांपडणारा असा दुसरा प्राप्त पुरुष सांपडणे कठीण. स्वतःच्या स्थितीविषयीं त्यांच्या तोंडून जर कधीं कांहीं वाहेर येत असेल, तर तें इतकेंच की 'बाबांनो, मी अंधश्रद्धावान् कधींच नव्हतो. तावून सुलाखून, सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर मी या स्थितीस आलों. ' याशिवाय स्वतःच्या स्थितिविषयी उद्गार त्यांच्या तोंडून निघाल्याची फार तर दोन चारच उदाहरणें त्यांच्या सर्व आयुष्यांत सांपडतील. एकदां त्यांस असा प्रश्न केला होता की -' पारलौकिक अस्तित्व व तत्संबंधी सर्व गोष्टी यांवर तुमचा विश्वास कसा बसला ? असा विश्वास बसणें चार गोष्टींनी