पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहावयाचें म्हणजे चमत्कारांचा मुख्य उपयोग ' मनु- ष्याच्या मनांत ईश्वराच्या सत्तेची खात्री पटून विश्वास उप्तन्न व्हावा व धैर्य यावें' येवढाच आहे. आणि त्या दृष्टीने पाहिले तर ' असे चमत्कार होतात व देवाची निरपेक्ष रीतीनें अनन्यगतिक सेवा करणाराला त्यांचा अनुभव अजू- नही येतो' म्हणून त्यांनी सांगितलेले शब्द देखील त्यांच्या शब्दाची किंमत बाळगणाऱ्या कोणालाही पुरे होतील, तिसरें असें कीं त्यांचें एकंदर धोरण जर पाहिले तर असे दिसतें कीं 'साधुत्वाच्या शेजेवर साधुसंतांच्या पाखरखाली अनंत काल लोळत पडणाऱ्या या महाराष्ट्राला दिव्यत्वाच्या भावना आणि अनुभव पारखे थोडेच आहेत ? परंतु गेल्या कैक वर्षांच्या पिछेहाटींत तो इतका मागें गेला आहे की या आपल्या वतनदारीची वहिवाट पुनः करूं लागण्यास ' मनुष्यत्वा'ची ही एक पायरी ओलांडणे त्याला प्राप्त झाले आहे | " आणि म्हणूनच मीही 'राष्ट्रपुरुष' या दृष्टीवरच जास्त भर ठेविला आहे व चटकदार होण्यापेक्षां पुस्तक जास्त उपयुक्त कसें होईल तेंच पाहिले आहे. सोईकरितां ग्रंथाचे चार खंड केले आहेत. पहिल्या खंडांत त्यांचें साद्यंत चरित्र, दुसऱ्यांत त्यांच्या साक्षा- परिचयानें मनावर उठणारा ठसा, तिसऱ्यांत त्यांच्या कांही मतांचें दिग्दर्शन आणि चवथ्यांत त्यांच्या सहवासांतील कांहीं लोकांची माहिती अशी वांटणी केली आहे. लोकांकडून आलेल्या माहितीचा समावेश याच खंडांत करावयाचा होता. परंतु ग्रंथ फार विस्तारल्यामुळे तो विचार सोडून द्यावा लागत आहे. ग्रंथास उपसंहार जोडला असून शेवटी त्रिकांड सूत्रात्मक अशा सांप्रदायिक तीन आरत्या दिल्या आहेत. केवळ त्यांच्या मनानेही कर्म, उपासना आणि ज्ञान यांचा यथार्थ बोध होईल. आमचे मित्र रा० मुकुंदशास्त्री मिरजकर यांनीं केलेलें श्रीअण्णासाहेब यांचें एक सुबोध स्त्रोत्रही दिले आहे. ह्या स्त्रोलाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ग्रंथांतील प्रमुख विषय व नांवें यांची विस्तृत सूची दिली असून छोटेसें शुद्धिपत्रही दिले आहे. ४ लहान मुलानें एकादें काम केले म्हणजे जसें घरच्या वडील माणसांस नेऊन दाखवावें त्याप्रमाणेंच या चरित्राचे कांहीं भाग वाचून विदर्भस्थ सुप्रसिद्ध विद्वान् श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांस दाखविले होते. त्यांच्या श्रवणाने त्यांना येवढा आनंद झाला कीं मांडीवरील जखम पुरी बरी झाली नसल्यामुळे बस- 4: