पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) चरित्र लिहिण्याची कल्पना नसल्याने हा साराच आठवणीचा खेळ झाला आहे. त्यामुळे चूक घडूं न देण्याची जरी पराकाष्ठेची काळजी घेतली आहे तरी देखील पुरुषाच्या भ्रमधर्मा प्रमाणे कित्येक चुका घडून आल्या आहेत. क्वचित् कोठें माहितीच्या भिन्नपणामुळे व कांहीं ठिकाणी लोकां- कडून आमच्या विनंतिप्रमाणे वेळेवर माहिती न आल्यामुळेही कांहीं दोष राहून गेले आहेत. परंतु ते सर्व गौण असून चरित्राचा मुख्य उद्देश साधण्यास त्यामुळे यत्किंचितही अडथळा होत नाही. त्याचप्रमाणे प्रुर्फे तपासण्याचे कामही एका हाती न झाल्यामुळे कित्येक ठिकाणी मुद्रणप्रमादानेंही चुका झालेल्या आहेत व विशेषतः विरामचिन्हांनी तर वरीच कामकारता केलेली आढळून येईल. एकादें लांबलचक शुद्धिपत्र देऊन हें सर्व दुरुस्त करतां आले नसते असें नाहीं पण तसे करून जागा न आडवितां जेथे कोठें अगदींच अर्थविप- र्यास होत असेल अशाच फक्त थोड्या स्थळांचें शुद्धिपत्र दिले आहे. बाकीची सर्व स्थळे अशीं आहेत की पूर्वापर संदर्भानें त्यांचा अर्थ लागण्यास कांहींच अडचण पडत नाही. भाषेसंबंधीही असेच म्हणता येईल. सर्व ग्रंथ तोंडानें सांगून लिहवून घेतला असल्यामुळे त्या दृष्टीनेही कांहीं दोष असती- लच. परंतु फलनिष्पत्तीच्या ते आड येऊं शकणार नाहीत. ३ अवतरणांतील 'पंतां'च्या उक्तीप्रमाणे अण्णासाहेब यांचें चरित्रही 'राजर्षी'चा 'ब्रम्हर्षि' झाला असेंच आहे. आणि त्यामुळे त्यांच्या चरित्रां- तही चमत्कार वगैरेंची बरीच गर्दी असण्याचा संभव आहे अशी पुष्कळांनी अटकळ केली असेल. कारण संत अथवा सत्पुरुष या दृष्टीने त्यांच्याकडे पहा- णारही कित्येक लोक असतीलच व त्यांनी तशी कल्पना केल्यास ती योग्यच आहे. परंतु या बाबतींत मात्र त्यांची निराशा होईल. चमत्का- रांचे हें एक सदर आम्हीं अजीबाद सोडूनच दिले आहे. त्याची कारणे उघ- डच आहेत. एक तर असे की त्यांचेंही चमत्कार सांगणारे जरी कित्येक लोक भेटतात तरी ते सारे चमत्कार अशा स्वरूपाचे आहेत की त्यांचा चमत्कार म्हणून उल्लेख करावा किंवा नाही याचा विचारच पडतो. म्हणजे कोणचाही आड पडदा न ठेवितां त्यांनी उघड चमत्कार असा कधींच केला नाही. दुसरें असे की त्यांनी चमत्कार केले नाहीत म्हटल्यानें त्यांची योग्यता कांही कमी होते अथवा केले म्हटल्यानें कांहीं जास्त वाढते असे मला तरी वाटत नाही.