पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) ण्याचा अतिशय त्रास होत होता व दुखण्याने अतिशय क्षीणता आली होती तरी त्यांनी ' चार शब्द ' मोठ्या प्रेमानें लिहून दिले. ते तसेच आरंभी जोडले आहेत. माझ्या कृतीचें त्यांनी जे हैं कौतुक केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असे म्हणणें देखील एका दृष्टीने अनुचितच आहे. तरी तसे म्हटल्यावां- चून राहवत नाहीं. ५ ग्रंथ प्रसिद्ध करावयाचे ठरले तरीही त्याचे पुढील खरकटें कोणीं निपटावें अगर त्याची काय सोय करावी तें ठरले नव्हतें. परंतु लोकांस अगाऊ कळवून कांहीं मिळाली तर पहाणें जरूर होतें. त्या करितां आम्ही आळंदीचे श्रीमहा- राजांचे हल्लींचे प्रतिनिधि श्रीभक्त माघवराव वुवासाहेब यांना विनंति केली व येणारी माहिती व मागण्या त्यांचेचकडे नोंदविण्याची व्यवस्था करून त्याप्रमाणे केसरींत जाहिरातही दिली परंतु त्या जाहिरातीखालीं बुवासाहेबांचा पत्ता देऊन वेगळी 'क्ष' ' लेखक' किंवा अशीच कांहीं सही करण्याचें धोरण न राहि- ल्यामुळे स्वतः बुवासाहेबच हा ग्रंथ लिहीत आहेत असा पुष्कळांचा गैरसमज होऊन त्याप्रमाणें पुष्कळांनी त्यांना विचारलेंही व त्या प्रत्येकाला उत्तरें ● देण्याचा त्यांना त्रासही झाला, याबद्दल मी त्यांची क्षमा मागतों, परंतु त्यांचा यांत कांहीं भाग नाहीं असे मात्र माझ्याच्यानें म्हणवत नाही. वरील प्रमाणे सर्व त्रास त्यांनी सोसला है तर खरेंच परंतु त्यांची आशीर्वादयुक्त सहानुभूति जर नसती तर मला हे पुस्तक इतक्या लवकर प्रकाशित कर ण्याचा घीर आला नसता. त्याबद्दल त्यांचाही मी ऋणीच आहे. ६ जाहिरात दिल्याप्रमाणे अर्थातच कांही माहिती तर आलीच व त्यांतील कांहीं फार उपयुक्त ही आहे. श्रीअण्णासाहेब यांना गुरुस्थानीं मानणारे प्रो० दीक्षित, श्रीगुंडगजाननाचे पुजारी ह. भ. केशवभट बाभळे, धुळ्यास कांहीं काळ. १ यांच्या आठवणीत श्रीअण्णासाहेबांशी परिचय कसा झाला व त्यांची योग्यता समजून त्यांचे ठिकाणी गुरुत्वभावना कशी उप्तन्न झाली त्याचप्रमाणे त्यांच्या प. वा. कुटुंबाचे हस्तें श्रीमहाराजांनीं श्रीअण्णासाहेब यांच्या समाधी- मंदिराच्या घुमटीचें काम कसे करून घेतले वगैरे हकीकत आहे. २ श्रीअण्णासाहेब यांची श्रीगुंडगजाननाचे ठिकाणी केवढी भक्ति होती, मद्रासेहून आल्यापासून ते होते तोपर्यंत कोणत्याही तऱ्हेनें आडूं न देतां त्या