८२ सालरजंग प्रकरण व मद्रास. वरच तें दिवशीं भागविण्यांत आले, तेवढेच निमित्त झाले. मधून मधून मूळ- व्याधीमुळे रक्त पडण्याची संवय यांना लहानपणापासूनच होती. परंतु या वेळीं तें सारखे २८ महिने पडतच होतें, व त्याचे प्रमाणही पुष्कळच चांगलें एक दोन ओंजळी असे! अर्से होतां होतां एक दिवस सहज चक्कर आल्या- सारखें होऊन आतां पडतों असे वाटू लागले. परंतु सावरून तेवढ्यांतल्या तेवढ्यांत खाली बसले, तरीही भागेना. म्हणून आंथरूण पसरून त्यांनी आंग टाकलें. व ताप भरून आला. घशाजवळ दुखतें असे वाटू लागल. व घशांतलें दुखणे वाढत जाऊन एकदोन दिवसांतच पोटांत कोणचाही पदार्थ न जाण्याचा यंदोवस्त झाला. त्याचवेळी आपणास काय झाले आहे, हे त्यांच्या लक्षांत आलें, परंतु जवळच्या माणसांनी घाबरूं नये म्हणून ते बाहेर कांहींच न दाखवितां पडल्या पडल्याच सर्व कारभार सुरळीत करीत. पोटांत पाण्याचा घोंटही जात नव्हता, तरी कोणी कांही दिले असतां त्याच्यासमोर तें घेऊन मुकाट्यानें तस्तांत थुंकून टाकीत. इतर पदार्थ तर असोत, पण विडा देखील दिलेला घेऊन पुष्कळ वेळां तोंडांत ठेवीत व कोणी नाहीं असे पाहून थुंकून टाकीत. त्यामुळे व दुखण्याच्या जोरामुळे क्षीणता येऊन ९ व्या दिवशीं फार कठीण अवस्था झाली. तिचें वर्णन ते स्वतःच सांगत. ‘ दोन्ही हातं टेंकून बाजेवर मांडी घालून अखेरची वाट पहात बसलो होतों. शरिरांत अनेक प्रकारच्या घडामोडी होत होत्या, व नाड्या तुटत होत्या. त्यांचा टाइपराइटरच्या खडखडीप्रमाणे आवाज ऐकूं येत होता. प्रत्येक श्वास व उच्छ्वास यास भयंकर क्लेश होत होते, व घशाची सूज वाढत होती. पांच दहा मिनिटांत घसा बंद होऊन श्वास थांबेल व प्राणोत्क्रमण होईल असे वाटत होतें. तरी बाजूच्या माणसांनी घावरूं नये म्हणून डोळे उघडून त्यांच्याकडे पहात होतों व मनांत नामस्मरण चाललें होतें. ५१२५ मिनिटेंच बाकी होती, की सर्व कारभार जागच्या जागीच आटोपला असता; परंतु महाराजांची योजना तशी नव्हती. त्याच सुमारास नित्याची पाळी नसतांही रामचंद्र अय्या हे त्या ठिकाणी अकस्मात् येऊन पोहोंचले, व पाहतात तो अण्णासाहेबांची अशी स्थिति । शरिरांत त्राण नसल्यामुळे मान वांकवूनच अण्णासाहेबांनी त्यांना नमस्कार केला. क्षणमात्र स्तब्ध उभे राहून ‘घाबरूं नकोस, मी आलों आहे, ’ म्हणून गोड शब्दांनी त्यांनी अण्णासाहेबांस
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०३
Appearance