पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालीय मूर्ति. ८१ बांधावर बसला. अण्णासाहेब बहिर्दिशेस बसले असतां सहज त्यांचें लक्ष झाडाच्या खोडाकडे गेलें. तो तेथें जेमतेम हातभर लांब असलेला सुमारें बोट- भर जाडीचा एक काळाकभिन्न नाग वेटोळें घालून इवलीशी फणा मिरवीत 'असलेला दिसला. हा साप इतका काळा होता की डोळे व दहाचा आंकडा खेरीज करून पोट व टाळू वगैरे जागा देखील त्याच्या काजळाप्रमाणे काळ्या होत्या. डोळे तांबडे लाल होते, व आंकडा मात्र पांढरा होता. याशिवाय एक अणुभरही जागा दुसऱ्या रंगाची नव्हती. त्यास पाहून अण्णासाहेबास मोठी मौज वाटली, परंतु त्याबरोबरच ही फार विषारी जात असावी, असा तर्क करून एकदम गडबड केल्यास तो आंगावर उडी टाकील, म्हणून ते त्याच्या डोळ्याशी डोळा देऊन पाहू लागले, व एकीकडे हळू हळूं शरीर शुद्धि करून कांही वेळ तसेंच टक लावून बसले. सापास मारावें, असा विचार त्यांच्या डोक्यांत कधींच नव्हता. उलट त्याने अंगावर उडी टाकल्यास शुचि- र्भूत अवस्थेत मृत्यु यावा, म्हणून हळूच शरीर शुद्धी करून ते त्याच्या उडीची वाट पहात बसले ! तोंच तें वेटोळे जे उडालें तें ज्या बाजूला रामा बसला होता तिकडेच फेंकलें गेलें. त्या सरशी 'रामा, अरे साप रे साप, अण्णासाहेव ओरडले. परंतु वेटोळें ५१२५ हातांवर पडून बांधांत कोठेतरी नाहींसें झालें. अण्णासाहेब घरीं आले व रामानेंही तांब्या आणून ठेवला. थोड्याशा वेळानें अण्णासाहेबांस बरें न वाटून लाळ सुटूं लागली, व तेथपासून म्हणजे दुपारचे २॥२॥ वाजल्यापासून तो सरासरी ८/९ वाजेपर्यंत गंगाळ पुढें घेऊन ते सारखी लाळ गाळीत होते ! दुसरा कोणीही मनुष्य एवढ्या शक्ति- पातांतून वाचर्णे कठीण होतें. परंतु त्यांची ताकदच मोठी, व धैर्य अप्रतिम म्हणूनच रक्ताचें सारखें पाणी होत असतांही त्यांनी टिकाव धरला. ऐकणारास अतिशयोक्तीचें वाटेल, परंतु या प्रसंग गंगाळ दीड गंगाळ पाणी गेल्याचें तें सांगत ! पुढेही कांही दिवस याचा परिणाम त्यांना जाणवला. मनुष्याच्या रक्ताचे पाणी व्हावे असा त्या कालीयमूर्तीच्या विषारी नजरेचा प्रभाव होता ! मद्रासेस गेल्यावर सुमारे ५१६ महिने गेल्यावर चैत्र शुद्ध १० मी पासून यांस रक्त पडूं लागले. रामनवमीचे शीं उपवास होता, व आपणास चालणारे उपवासाचे पदार्थ तेथें कांहींच मिळत नसल्यामुळे नुसत्या कलिंगडा- १ म्हणून ६ 0 म. म. द. वा. पोतदार, ग्रंथ संग्रह