पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्जन्म, ८३ ( १ (( दिला. अण्णासाहेब असे सांगत कीं, हे बोलत असतांना त्यांचा चेहरा तापलेल्या ·लोखंडाप्रमाणें लाल झाला, व डोक्यावरील केस कांट्यासारखे उभे राहिले. चाहेर आंगणांत जाऊन 'वरदडा' ('अरे वरद्या,') म्हणून त्यांनी देवास एक शिवी हांसडली, व याच्या केंसास धक्का लागला तर मी जीभ हांसडून प्राण देईन, लक्षांत ठेव' म्हणून आरोळी ठोकली ! अण्णासाहेब असे सांगत कीं, हे शब्द ऐकतां क्षणीच सारी खडखड एकदम बंद झाली, यंत्रांत यंत्रे वसविल्याप्रमाणें शरिरांत सर्व व्यवस्था ठीक झाली, व श्वासही सुरळीत चालून एकदम मोठा आराम वाटला ! स्वामी आंत आले, तेव्हां त्यांचा राग नाहींसा झाला असून मुद्रा पुन्हा शांत व गंभीर झाली. जणूं काय कांही विशेष झालेच नाहीं अशा रीतीनें कांही इकडे तिकडे बोलून स्वामी निघून गेले; व अण्णासाहेबांची प्रकृति सुधारून ते बरे झाले. परंतु या दुखण्यानें त्यांना इतकी अशक्तता आली कीं, तिचा परिणाम पुढें ६।७ वर्षे सारखा राहिला होता. पुण्यास आल्यावर तुम्ही आपले पहिले उद्योग कां सुरू ठेवले नाहीत ? " म्हणून मी त्यांना वि- चारले तेव्हां त्याचें कारण त्यांनी हेंच सांगितले. कामचलाऊ व्यवहार जरी मी करीत होतों, तरी खरें काम हातून होणें शक्यच नव्हतें. अशक्तता इतकी भयंकर होती की, पाण्याचा तांब्याही वेसावधपणाने डोक्यावर एकदम ओतला गेला, तर सान्या शरीरांतील प्राण एकत्र गोळा होऊन येत, व बराच वेळ कठीण अवस्था होत असे. अशी स्थिति ६।७ वर्षे होती व पुढे हळू हळूं मी पुन्हां समाजांत वावरूं लागलो. परंतु मधल्या काळांत साराच मनु पाल- टून गेला होता. ” यावरूनही बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. त्यानंतर पुण्यास बाबाची मुंज नानासाहेबांनी ठरविली, आणि अण्णासाहेबांस परत येण्याबद्दल महाराजांकडून आज्ञा करविली. तेव्हां ती प्रमाण मानून अण्णासा- हेव परत यावयास निघाले. “ येतांना कंचीस जाऊन ये" अशी महाराजांची पूर्वीची आज्ञा होती, त्याप्रमाणे पूर्वी पांच चार वेळां प्रयत्न केले असतांही त्यांचे कंचीस जाणें झालें नाहीं. तो योग येतांनाच जावें असा होता असे दिसतें. त्या प्रमाणें कंचीस जाऊन श्रीवरदराजांचें दर्शन घ्यावें आणि तेथूनच पुण्याचे गाडींत बसावें असें ठरलें. ८८ मद्रासच्या या मुक्कामांतच त्यांनी कार्तिकस्वामी, पांक्षेत्र, गिरीचे बालाजी वगैरे स्थळे पाहून घेतली. मद्रास इलाख्यांत एक लहान व एक मोठे अशीं