पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालरजंग प्रकरण व मद्रास. ठेवल्यामुळे असो, पण चांदीची कांव कधींही बनली नाहीं, व तो नाद त्यांनी सीडून दिला. ८० पूर्वीचे लोक कमरेभोवती गुंडाळून ठेवलेल्या लढाऊ पट्ट्याचा उपयोग करीत असत. हा पट्टा कसा असतो, ते मद्रासेस पहावयास मिळाले, असे त्यांनी सांगितलें. एकवेळ एक पांथस्थ ब्राह्मण जेवावयास आला. तो मराठा आहे, हें अण्णासाहेबांनी तेव्हांच ओळखिलें, त्याने जेवणाकरितां काढून ठेवलेली वंडी ओटी झाडण्याकरितां उचलीत असतां, तिच्या खिशांतून एक जड व जाड गुंडाळी बाहेर पडली. ती तशीच गड्यानें आणून अण्णासाहेबांना दाखविली. पाहतात तों, तीव्र धार असलेला तो एक लांब पट्टा होता. त्यावरून चौकशी केल्या- वर त्या माणसानेही यांच्यावर विश्वास टाकून आपली हकीगत सांगितली. हा मनुष्य वासुदेव बळवंताचा एक उत्तम साथीदार असून, स्वतः वासुदेव बळवंत पकडला गेल्यामुळे देशोधडीस लागला होता. पट्टा वापरण्याच्या कलेत ते दोघेही फार निष्णात होते. एक दिवस तेथें राहून, तो मनुष्य कोठे गेला, कांहीच कळले नाही. मद्रासेस असतां एका अद्भुत नागाचें यांना दर्शन झाले. एकदां कंचीचे राम- चंद्र अय्या व अण्णासाहेब फिरावयास ह्मणून निघाले. कांही अंतरावर गेल्यावर मोटारच्या आवाजासारखा आवाज लहान प्रमाणावर ऐकूं येऊं लागला. तेव्हां रामचंद्र अय्यांनी हाती धरून यांस जागच्या जागींच उभे केले. सुमारें अर्ध- मिनिट झालें नसेल तोंच, एक प्रचंड नाग यांच्यासमीरून आडवा गेला.. त्याचाच तो आवाज होता, व त्याच्या वेगानें बारीक खडे आणि धूळ उडत होती. या नागाचे डोळे सरासरी अधेली एवढे होते ! व फडा जवळ जवळ १॥ १॥॥ हात रुंद होती! त्याचे मानानें त्याची जाडी असून, लांबी कमींत कमी ४०/५० फूट असावी असे त्यांस वाटलें! नाग मात्र अत्यंत चपळ असून तेजस्वी होता. हें प्रचंड धूड पाहिल्यावर कोणीही बेशुद्ध होऊनच पडाव- याचा; परंतु यत्किंचितही भीति न वाटतां त्याच रस्त्यावरून दोघेही फिरावयास गेले! अशाच प्रकारें याच्या उलट, एका सूक्ष्म कालीय मूर्तीची गांठ पडल्याचीही हकीगत ते सांगत. त्यांना वहिहिशेस जावयाचें होतें, म्हणून शेतांतील एका मोठ्या झाडाजवळ रामानें तांच्या भरून ठेवला, व तो स्वतः शेपन्नास हातांवर एका