बृहद्योगवासिष्ठसार. मला नागविले, मी या अगाध व दुस्तर संसारसागरांतून वर निघण्या- करिता एकसारखी धडपड करीत आहे; पण काय करू ? हे निर्दय मन मला वर येऊ देत नाही. बराच वेळ प्रयत्न करून काही मार्ग चालून यावे तो ते असा एक हिसका देते की त्याच्यायोगानें मूळघ्या स्थानाहूनही दूर जाऊन पडावे लागते. कोठेही जा व कितीही उपाय योजा, ते पिच्छा सोडीत नाही. मला वाटते की स्वतः काळही त्याला हात जोडीत असेल. ते अमर आहे की काय ? असाही भास होतो. समुद्रास पिऊन टाकिता येईल पण या मनाचा निग्रह करिता येणार नाही. हे मन आहे ह्मणूनच विषय, सुख, दुःख, इहलोक व परलोक आहे. ते क्षीण झाले की मी नाही, तुह्मी नाही; राज्य नाही, राजा नाही, प्रजा नाही; सुखदुःख नाही; शत्रु- मित्र नाहीत, शास्त्र नाही, शास्ता गुरु नाही, बध नाही व मोक्षही नाही. यास्तव याच्या क्षयाकरिता प्रयत्न केला पाहिजे. यद्यपि ते सामान्य प्रयत्नास यश देत नाही, तथापि विवेकबलाने त्याला क्षीण करून सोटप्याचा मी दृढ सकल्प केला आहे. या मनास जिकण्यात जो पुरु- पार्थ आहे त्याच्या सहस्राशही इतर महत्कृत्यात, शेकडो राज्ये मिळविण्यात व अपार सपत्ति साठविण्यात तो नाही १६. सर्ग १७-सर्व पापाच्या समूहाची जननी, दैन्य, कार्पण्य व मृत्य देणारी आणि सर्व जगास भ्रमण करावयास लावणारी जी तृष्णा तिचे येथे वर्णन केले आहे. परतु हे मन तृष्णेच्या योगाने अति पुष्ट झाले आहे. आत्म्यास आच्छा- दित करून व विवेकास हृदयातून हाकलून देऊन तृष्णा चित्तात प्रवे करते, व तेथेच तिला चिता ही मुलगी होते. आशा व तृष्णा या सख्या बहिणीच आहेत. पण पुष्कळ वेळा त्या दोघी आहेत, असे वाटत नाही. कारण त्याचा आकार अगदी सारखाच भासतो. ज्याना याची चागली ओळख आहे तेच मात्र त्यास बरोबर ओळखू शकतात. मन, आशा, तृष्णा व चिता या चवकडीच्या जाळ्यात सापडलेला मनुष्य घोर यातनातून सुटेल, ही आशा करणेच व्यर्थ आहे. मी जो जो निश्चय करितो तो तो या तृष्णेच्या भीतीने पळून जातो. कारण ती त्यास जणु काय तोडीत सुटते. पाण्यात वाळलेले पान जसे तरगत असते; वाव- टळीत सुकलेली गवताची काडी जशी उडत रहाते किंवा अतरिक्षां
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/३४
Appearance