१. वैराग्यप्रकरण-सर्ग १८. मेघाची जशी तिरपिट उडते त्याप्रमाणे या तृष्णाचक्रात सांपडल्यावर माझी अवस्था होते. तृष्णा ही एक भयकर अग्निज्वालाच आहे. ती मला एकसारखी जाळीत सुटते व तो दाह अमृतानेही शांत होईलसें वाटत नाही. ही मनाच्या सहायाने मला कोठे कोठे घेऊन जाते याचा काही पत्ता लागत नाही. जड झणजे अनात्म, झणजेच आत्म्यावाचून इतर पदा- र्थाशींच सबध ठेवणारी ही बया रहाटगाडग्यास लाविलेल्या मोध्याप्रमाणे जी- वाकडून खालून वर व वरून खाली हेलपटे घालविते. व्यावहारिक जन बैलाच्या नाकात वेसण घालून त्यास जसे हवे तिकडे नेतात त्याप्रमाणे ही मनुष्यास किबहुना प्राण्यास खेचून नेते. ही मज धीरासही भिवविते, डोळसामही अध करिते व सुखी आणि भाग्यवान् पुरुषासही खिन्न करिते. कोणी आनदाने राहू लागल्यास ते हिला खपत नाही. मनष्याच्या हृदयाचे तुकडे कसे करावे हे हिला चागले अवगत आहे. हा देह जरी जरा, रोग इत्यादि निमित्तानी जर्जर व अशक्त झाला तरी ती सदा नवी तरुणीच असते. हिची कधी तृप्ति होत नाही. आत्म्याचे अज्ञान जितके वाढत जाईल तितके हिला आपली वृद्धि करून घेण्यास फावते, अशक्य पदार्थाचीही ही पिच्छा सोडित नाही, सर्व गुणाची हिसा करण्यास ती सदा टपलेली असते. जगातील सर्व प्राणी या तृष्णेच्या पायीच इतके दुःख भोगीत आहेत. पण तिला सोडण्याचे धैर्य प्रायः कोणामध्ये नाही. हिच्यापुढे मोठमोठ्या शूराचे शौर्य, यतीचा निग्रह, मत्र्याचे मत्र, ज्ञानी परुषाचे ज्ञान, विरक्ताची विरक्ति व मानी पुरुषाचे मौन लटपटन जाते. तरवारीची धार, बाणाचे तापलेले अग्र व यमदूताचे शूलही हिच्या इतके तीक्ष्ण नाहीत. हे महाप्राज्ञ, या पिशाचास गाडून टाकण्याचा एकादा मत्र आपणास माहित असल्यास मला सागा १७. सर्ग १८-आधि, व्याधि, अनेक क्लेश, जरा, मरण, मान, तृष्णा इत्यादिकाचें आदि कारण जो क्षणभंगुर देह त्याची येथे निंदा केली आहे. ज्याच्या स्वास्थ्याकरिता प्राण्याची एकसारखी खटपट चालते, ज्याच्या आश्रयानेच वर सागितलेली मनादि-चवकडी रहाते, ज्याच्या द्वारा अहित व हित ही. दोन्ही होऊ शकतात, ज्याच्या करितांच एक प्राणी दुसन्या प्राण्याचे अन्याय, बलात्कार व छल सहन करितो; ज्याच्या लोभामुळेच प्राणी साहस करू शकत नाही, तर भिऊन स्हातो, मनांत असलेले सत्यही उघड
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/३५
Appearance