१. वैराग्यप्रकरण-सर्ग १५. त नाही; त्याच्यावर अनेक प्रकारची सकटे आणते व ते रोगांचे परटे होऊन रहाते. जुन्या झाडास जसे किडे पोखरून टाकितात त्या. माणे दुःखे या शरीरास खिळखिळे करितात. उदरास धरून, खाऊन प्रकण्याकरितां जसा बोका टपून बसतो त्याप्रमाणे या आयुष्याचा नाश करण्यास मृत्यु टपलेला असतो. अधाशी पुरुष जसें पुष्कळ अन्न खाऊन फस्त करून टाकितो त्याप्रमाणे जरा (वार्द्धक्य) आयुष्यास पचवून शरीरास क्षीण करून सोडिते. सुजन जसा दुर्जनाची संगति सोडितो त्याप्रमाणे नारुण्य थोड्याच दिवसात या दुष्ट शरीराचा त्याग करिते. कामी पुरुष जसा सुदर स्त्रीचा सदा अभिलाष करीत असतो त्याप्रमाणे कृतात या अयुष्याची इच्छा करितो. साराश आत्मोन्नति करून घेण्याकडे ज्याचा उपयोग होत नाही ते आयुष्य अति तुच्छ, गुणरहित, व क्लेशकारि होतें १४. सर्ग १५-सर्व अनर्थ व ममत्व याचे मूळ जो अहकार त्याची येथे निदा केली आहे. ___ मुनिराज, दुरहकार हा एक प्रवल शत्रु आहे. मला त्याचे फार भय वाटते. आत्म्याचे ज्ञान नसल्यामुळेच हा उद्भवतो व व्यर्थ याची वाढ होते. या अहकारामुळेच मनुष्याच्या हातून अनेक दोष घडतात. विषयलपट झाल्यामुळे दीनाहून दीन झालेल्या लोकास अनेक प्रकारच्या कष्टमय संसारात पाडणारा हा अहकारच आहे. याच्यामुळेच प्राण्यास शारीरिक व मानसिक दुःखे भोगावी लागतात. याच्या योगानेच मनुष्यास इच्छा होतात, या अहकाराच्याच कृपेने “ माझे, माझे, " हें पिशाच किवा हा रोग मनुष्यास ग्रासतो. याच फार दिवसाच्या शत्रच्या भयाने मी अन्न खात नाही, जल पीत नाही, व भोग भोगीत नाही. सर्व लहान मोठी सकटे याचीच बालके होत. शाति, वैराग्य, दैवी सपात्त व सर्व सगुण यास जाळून टाकणारा हा प्रबल अग्निच आहे, आसुर सपत्तीची उत्पत्ति याच्याच पासून होते. जगातील भाडणे, वाद, लढाया, कष्ट व बलात्कार याचे अहंकारावाचून दुसरे काही कारण सागता येण्या- सारिखे आहे काय ? पशु, पक्षी व इतर सर्व प्राणी यामध्येही अहकार असतो. पण तो व्यक्तीच्या पलीकडे जात नाही. तो त्या त्या प्राण्यापुरताच असतो, व त्यामुळे खानपानादि व शरीररक्षण याच्या पलिकडे त्या त्या प्राण्याची महत्त्वाकाक्षा नसते. शिवाय शरीरस्थितीस या
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/३३
Appearance