२८ बृहद्योगवासिष्ठसार. पण या अस्थिर आयुष्यावर आस्था ठेवणे योग्य होणार नाही. तें तेल संपलेल्या दिव्याप्रमाणे आहे, आहे, ह्मणेपर्यंत निघून जाते. पण त्याचा हा महा दोष ठाऊक असतानाही सर्व प्राणी व विशेषतः मनुष्य ते दीर्घ व्हावे असें इच्छितो, व दीर्घ आयुष्य सपादन करण्यांत हेतु कोणता तर-यथेच्छ दुःख भोगणे-हा. कारण काही थोड्याशा पुण्यवानावांचून किंवा निःस्पृह धार्मिकावाचून बाकीच्या सर्व जीवास अधिक आयुष्यात अधिक क्लेश होणेच शक्य आहे. पण असल्या जिण्यास जिणेच झणणे अयोग्य आहे. व्यर्थ आयुष्य कोण नाही घालवीत ? पशु व पक्षी याच्या आयुष्याचा व जिण्याचा त्यास परमार्थतः काही तरी उपयोग होतो का? झाडे, झुडपे, माशा, मुग्या, किडे इत्यादि प्राणी आपापल्या आयुर्मर्यादे- प्रमाणे जिवत नाहीं का रहात ? पण त्यांस जिवत झटल्यावर मृत कोणास ह्मणणार ? ज्याच्या शरीरात प्राणवायु नाही त्यास ? मी तर असे सम- जतो की, ज्याच्यायोगाने अवश्य प्राप्त करून घ्यावयाची वस्तु प्राप्त करून घेता येते, ज्याच्या योगाने पुनरपि शोक करावा लागत नाही व जे परम समाधानाचे स्थान असते तेच जीवित (जिणे) होय, व ज्याचे मन मनन करण्यात गुतलेले नसते, ह्मणजे विषयचितनाने विक्षिप्त झालेले नसते तोच मनुष्य जिवत आहे अर्थात् अतःकरण कामादिमलरहित झाल्यामुळे स्थिर, एकाग्र व सूक्ष्म होणे किवा कामादिकाचा त्याग करून शुद्ध वासनाच्या योगाने त्यास स्थिर करणे हेच जीवितसाफल्य आहे. या दुलेभ मानुषयोनीत जन्म घेऊन सदाचरणादि साधनाच्या योगाने जे धन्य पुरुष पुनर्जन्माचे बीजच नाहीसे करितात, तेच जन्मास आले, असे मी समजतो. अनेक जन्माचे बी तयार करण्याकरिता उत्पन्न होणाऱ्यास मी " जन्मास आले " असे ह्मणत नाही. उलट त्यांचा जन्म मरण- तुत्यच आहे. अविवेक्यास शास्त्राचा, कामासक्तास ज्ञानाचा व अशात मनुष्यास मनाचा जसा भार होतो तसाच आत्म्यास न ज्ञाणणाया पामरास शरीराचा भार होतो. “याचे कसे होईल" ही चिता त्यास सोडीत नाही. ज्याला उत्तम बुद्धि नसते त्यास रूप, आयुष्य, बुद्धि, अहकार व शरीराची चेष्टा ही सर्व भारवाही पुरुषाच्या क्यावरील भाराप्रमाणे जड होतात. अहो, हे आयुष्य प्राण्यास श्राति घेऊ देत नाही, त्याची इच्छा कधी पूर्ण होऊ
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/३२
Appearance