पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. बार रुपये २ दोन दलालीचा शिरस्ता आहे त्या प्रमाणे करार करून दिल्हे असे. सुदामत बंदरमजकुरीची चाल दलालीची असेल त्या प्रमाणे वतन अनभवून सुखरूप राहणे ह्मणून दादा भाईचे नांवें सनद १. [ १४८ ] आपाजी शितोळे नाव्हीकर चिमणाजी बापूजी यांचे निसबतीस होते ते मंडलीयावर ठार झाले. बरे मर्द माणूस कार्याचे होते. यास्तव त्यांचे सर्व प्रकारे चालवावें इ. स. १७४२-४३. सलास आबैन हे अगत्य. यास्तव त्यांचे पुत्र मुधोजी शितोळे शिंदे गव्हाणी आहेत. त्यांस मया व अलफ. आपल्या जवळ आणून चार गोष्टी समाधानाच्या बोलोन बहुमान करून जमादिलाखर २. बावीस मोहरांची कडी २ दोन करून त्यांच्या हाती घालणे. त्यांच्या मातुश्रीचें व बंधूंचे समाधान करणे ह्मणून चिरंजीव राजश्री सदाशिवपंत यांस पत्र. [ १४९ ] शेख दाऊद दरकार साहूकार साकीन ठाणे साष्टी यास राहावयास बक्षीस १७४२-४३. वाडा ठाणे मजकुरी दिमत रोलीस पिरीस किरिस्ताव ठाणे साष्टी सल्लास आबैन याचा वाडा बाजारचे रस्त्याचे दक्षिणेस होता त्यापैकी. मया व अलफ. साबान १४. वाडा हात. वाड्यांतील घर हात. ५६ उत्तर दक्षण समेत रस्ते. ४२ उत्तर दक्षण. या मध्ये सात हात जागा ३९ पूर्व पश्चिम. नवी घेतली आहे ते देखील. ४१ पूर्व पश्चिम ३९ वाडा. २ गल्ली पश्चिमेकडे. - वाड्यांत झाडे. १ माड, १ शिताफळ. १ सेवगा. १ आंबा. येणे प्रमाणे वाडा समेत घर व झाडे तुझांस दिल्हा असे. तुझी अवलाद अफलाद उदमी वेवसाय करून सुखरूप राहणे ह्मणोन सावकार मजकुराचे नांवें पत्र १. येविशी रामजी महादेव नामजाद प्रांत साष्टी यांस पत्र की सदरील वाडा समेत घर व झाडे बक्षीस दिली असेत यांचे हवाला करणे ह्मणोन पत्र १. ( 148 ) A letter to Sadashivpant. Appaji Sitole of Nhavi, a brave and devo ted officer was killed at Mandla. Sadashivpant was directed A. D. 1742-43. to invite his son, Mudhoji Sitole, and after condoling with him in his bereavement to honor him with a present of 2 golden rings. (149) A house belonging to a Christian of Salsette was granted to Shek A.D. 1742.43 Daud Darkar, merchant of Salsette, for residence.