पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. दगड काढिलेत. त्याची गडबड चाहूल पुढे चौकिदार बसले असतात त्यांस आयकों येते. असे असतां चौकिदारांनी खबरदारी न केली. हे अंतर त्यांजकडे व किल्ले मजकुरी कारभारी नारो गणेश निसबत गोविंदराव मोरेश्वर गोळे होते त्यानीं जामदारखान्या भोवताली चौकी ठेवावी ते न ठेविली हे गाफिली कारकुनापासून जाहाली. याप्रमाणे दोघांतून अंतर पडली. सबब यांजपासून ऐवज घ्यावा. रुपयेः २७९ नारो गणेश कारकून निसबत गोविंदराव मोरेश्वर यांजपासून ऐवजाचा तिसरा हिस्सा. ५४७॥ पुढे चौकीस लोक ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी होते त्यांजपासून त्यांचे दि मतदारापासून मिळोन ऐवजाचे दोन हिस्से... ८२२॥ येकूण आठशे साडेबेवीस रुपये सदरहू प्रमाणे घ्यावयास करार करून ही सनद तुह्मांस सादर केली असे. तरी नारो गणेश यांजपासून पावणे तीनशे रुपये रोख घेणे. लोकांचे पांचशे सार्ड सत्तेचाळीस रुपये त्यांचे नांवें बद्दलमुशाहिरा खर्च लिहिणे पत्र १. ९ इनाम नक्त नेमणुकी वतने वगैरे. (अ) देणग्या. १ नोकरी केल्याबद्दल अगर नुकसानी झाल्याबद्दल अगर मेहेरबानी दाखल. [ १४५] राजश्री बापूजी बाजीराव यांचे तीर्थरूप बाजी भिवराव पुरातन राज्यांतील सेवक एकनिष्ठपणे सेवा करीत आले. हल्ली फिरंगाणचे मसलतेस ताराइ. स. १७४०-४१. इहिदे आईन पूरचे येलगरसमयीं युद्धांत कामास आले. यास्तव याजवरी कृपाळु मया व अलफ. होऊन मौजें रेठवडी तर्फ खेड प्रांत जुन्नर हा गांव मोंगलाई व बाबती व साबान ७. चोथाई व सरदेशमुखी व साहोत्रा देखील इनाम यांशी व यांचे पुत्र पौत्रादि वंशपरंपरेनें दिल्हा असे. अनभवितील. या पत्राची प्रत लिहून घेऊन अस्सल प्रत भोगवटीयास मशारनिल्हेजवळ परतोन देणे. प्रती वर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे ह्मणून पत्रे दिली. १ देशाधिकारी व देशलेखक वर्तमान भावी सुभा प्रांत जुन्नर. १ देशमुख देशपांडे प्रांत जुन्नर. १ मौजे मजकुरांत. (144) A theft of Rs. 822-8 took place from the treasury of fort Chandan garh. The Karkoon in charge was ordered to make good one A. D. 17 60-61. third of the amount for his failure to keep a watch round the building, and the guard on duty to make good the remaining i for their negligence. IX Grants and continuance of Inams, Allowances, Walans &c. (A) Grants. (1) For service done or injury received or as a mark of favour. (145) Baji Bhiwrao lost his life in the battle of Tarapur during the Cam paign against the Portuguese. A village was given in Inam to A. D. 1740.41. his family.