पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (अ) दिवाणी... Administration of Justice, (a) Citril. ३ wwwwwwwwww १८. [६] रामाजी बाबाजी हवालदार तर्फ पाली याशी पत्र की, तर्फ मजकूर येथील शूद्र प्रही, ज्योतीषपण व उपाध्यपण व धर्माधिकारीपण या तिन्ही वृत्तींचा इ. स. १७४६-४७ सबा अबैन कजिया हुजूर आला आहे. ऐशास मनसुफी मनास आणितां जमीदाराचा मया व अलफ. दाखला असला पाहिजे. त्यास जमीदार हुजूर आणावे तों स्वारीची ' गडबड आहे, याजकरितां जमीदार आणावयाचा मजकूर ठेऊन तर्फ मजकूरचे शुद्रग्रही, ज्योतीषपण व उपाध्येपण व धर्माधिकारीपण अमानत करून सरकारांत ठेविलें आहे. तरी तुझी तर्फ मजकूरचे सदरहु तिन्ही वृत्तींवर परकी ब्राह्मण ठेवून वृत्ती चालवणे. वृत्तीसंबंधे उत्पन्न होईल तें सरकारांत जमा करणे. पेस्तर जमीदार हुजूर आणून मनसुबीमुळे वृत्ती ज्याची होईल, त्याच्या स्वाधीन केले जाईल ह्मणून पत्र. [७] रामाजी महादेव नामजाद प्रांत साष्ठी यासी पत्र की फकीरा चांभार वस्ती मौजे ..वावले तर्फ ठाणे याणे हुजूर येऊन विदित केले की, आपला सासरा इ. स. १७४७-४८ समान अईन पद्या चाम्हार वस्ती विरार प्रांत सायेवान येथें होता तो निपत्रिक मया व अलफ. होताः भाऊबंद होते; त्यास मरतेसमयीं कांहीं वस्तभाव होती त्यापैकी २ कांही आपले स्त्रीस दिली, व कांहीं आपले भावास दिली. त्यास आज बहत वर्षे झाली. सांप्रत माझा भाऊ गणा चांभार याण अदावतीने सुभा जाऊन चुगली केली. त्याजवरू सुभाहून माणसें पाठवून आपले घर खणोन नेले. असें वर्तमान फकीरा मजकर याणे विदित केले. त्याजवरून बहुत वर्षीचा फिरंगीयाचे अमलांतील कजिया आणि पद्या जिवंत असतां आपले लेकीस कांहीं दिल्हें, कांही आपले भावबंदास दिल्हें, त्याजवरून चांभार मजकरावर नजर देऊन निमे ऐवज सरकारांत घेऊन निमे ऐवज चांभारास द्यावा असा करार झाला असे. तर निमे सरकारांत जमा करणे व निमे चांभार मजकुराचे हवाला करणे ह्मणोन पत्र १. (6) A complaint regarding the watan of village-astrologer and village-priest. was received at the Huzur. The evidence of the district officers A. D. 1746-47. was necessary for the determination of the matter in dispute. As the Peshwa was about to proceed on a campaign, it was not possible to secure their attendance in Poona before his departure. The watans were therefore temporarily kept under attachment. (7) Padya, shoe-maker of Wirar in Pargana Sayewan died without a son and at the time of his death gave a portion of his property to his AD. 1747.48. daughter, wife of Fakira of Wavle in Tarf Thanna and the rest to his brother viz, Ganu Chambhar. The latter however complained to the Subha, who sent men to Fakira's house and took away his property Ramaji Mahadev, officer of Prant Salsette was informed that having regard to t fact that the dispute had originated in the time of the Portuguese, and that more over Padva had during his life time distributed his property between his daughter and his relations, Government were pleased to direct that half the property should be restored to Fakira, the remaining half being taken for Government.