पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. केशव वर्तक याने सदरहू वतनाचे कृत्रीम कागद करून आमचे वतनास मुजाईक होऊन सरकारचे पत्र राजश्री मोरोजी शिंदे तालुकदार जंजिरे रत्नागिरी, यांशी घेऊन आमांस तेथे नेऊन न्याय यथास्थित न होतां त्याचे कृत्रिम कागदाची चौकशी न करितां, जोरावरी मजवरी करून तालुकदारांही सदरहू वतने वर्तकाचे स्वाधीन केली, त्याजवरून आपण हुजूर आलो. स्वामीस विनंति करून वाद्यास आणविलें, स्वामीनी राजश्री नारो अपाजी पाडलीकर यांशी इनसाफ करावयाची आज्ञा केली. त्यांनी हरदुजणांच्या तकरीरा व जामीन रजावंदीने घेऊन कर्यात मजकूरचे देशक आणून बाळकृष्ण वर्तकाजवळ कृत्रीम कागद होते त्यांची चौकशी करितां शंकराजी महादेव व आपाजी गोपाळ खरे देशकुळकर्णी कर्यात मजकूर यांनी सांगितले की, दामाजी त्रिमल यांचे दस्तूरचे कागद ह्यणून वर्तकानें काढिले आहेत, त्यास दामाजी त्रिमल उपजोन एकशे पंचवीस तीस वर्षे झाली. व मरोन पासष्ट वर्षे झाली. कागदास एकशे साठ वर्षे होतात. कागद दामाजी त्रिमलाचे हातचे नव्हेत. कृत्रिम आहेत ह्मणोन बोलले. मुधोजी वाणस त्याचा पुत्र कृष्णाजी त्याचा खंडो कृष्ण याचा हल्ली बाळाजी खंडो असे चार पुरुष सदरहू प्रमाणे दोन्ही वतनें अनभवीत आले. वर्तकाचे कुळकर्ण असे कधीही ऐकिलें नाही. व हल्ली कागद काढिले, तेही आपणांस ठावके नाहीत, ह्यणोन समस्त देशकांनी साक्ष दिली. कागदास स्पष्ट रंग धूर व शाई ही नवीं बोटाने शिके केलेले दिसतात. जुने कागद नव्हेत. त्याजवरून वर्तकाचे कागद कृत्रिम झाले, व भोगवटाही त्याचा नाही. याजकरितां इनसाफाचे रुईने वर्तक खोटा झाला. पंचाइतांनी त्याचे येजित पत्र घेऊन आपणांस दिले. तें हुजूर आणून दाखविलें. निवाडपत्र द्यावयाशी आज्ञा झाली. पत्रे तयार होत असतां येजितपत्र मजपासून गमाविले. याजकरितां दुसरें येजितपत्र देवावें ह्मणून विनंति हजर केली. त्याजवरून सरकारांतून वर्तकास तगादा केला. तो ब्राह्मणपणाचें हिमायतीने रवेईस आला. त्यास सदरहू इनसाफाचे कागदपत्र आहेत ते मनास आणून मजवरी कृपाळू होऊन भोगवटीयास निवाडपत्र करून द्यावयाची आज्ञा झाली पाहिजे ह्मणून. त्याजवरून मनास आणितां वर्तकाने कृत्रीम कागद काढून तुझ्या वतनास मुजाईक झाला होता. परंतु भोगवटा चालला नाही. इनसाफाचे रुइन वर्तक खोटा झाला. सदरहू वतनाचे कागदपत्र होते ते त्याने सरकारांत दिले. येजितपत्र लिहून दिले होतें तें तुवां हुजूर आणून रुजू केले होते. परंतु तुवां गमाविले. यामुळे वर्तकास येजितपत्रविषयीं तगादा केला. त्याने धटाई करून येजितखत न देई यास्तव त्यांस गंगापार केला; तुझा भोगवटा चार पुरुष सदरहू वतनावरी आहे हे देशकांनी निवेदन केले. त्यावरून तुझी दोन्ही वतने खरी जाणून तुजवरी कृपाळू होऊन हे निवाडपत्र सादर केलें असें. तरी माज: मजकूर देखीलवाडा, नाचणे, जुवे, व मिर्या येथील कुळकर्ण व पेठ शिवापूरचे मीठ बंदर पथकीपण हक दक मानपान इनाम इकराम कानू कायदेसुद्धां सुदामत चालत आल्या प्रमाण तुझी व तुमचे पुत्र पौत्रादी, वंशपरंपरेनें अनभवून सुखरूप राहणे. वतन संबंधी तुझे मामा P