पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. येणेप्रमाणे दोन वाडे व पासष्ट बिघे जमीन दरोबस्त कुलबाब कुलकानु स्वराज्य व मोंगलाई एकूण दुतर्फा देखील सरदेशमुखी व इनाम तिजाई हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी खेरीज हकदार करून मशारनिल्हेस इनाम देऊन ही सनद सादर केली असे. तरी मौजें मजकूरी सदरहू लिहिल्याप्रमाणे चतुःसीमापूर्वक दोन वाडे व जमीन पासष्ट विधेपैकी. पाटिलाकडील पालक इनामांत पन्नास विध जमीन लिहिली आहे. त्यास पाटील मजकुराची पालक इनामाची मोजणी करून होईल ते पन्नास बिध्यांत मजुरा देऊन कमी जाहाली तरी पाटलाचे मिराशी शेतापैकी पुरवून देऊन पासष्ट बिधे जमीन चतुःसीमा पूर्वक मशारनिल्हेचे दुमाला करून यास व याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें साल दरसाल इनाम चालवणे. दरसाल नवीनपत्राचा हुजूर न करणे. या सनदेची प्रती लिहून घेऊन ही अस्सल सनद भगवंतराव मजकूर याजवळ भोगवटीयास परतोन देणे ह्मणोन सनदापत्रे. (व) गुन्हे. ३ दुखापत. [ ८३ ] नारो बाबाजी नामजाद परगणे नेवासें, वगैरे महाल यांस सनद की, प्रवरासंगमकर ___ पाटील व टोकेकर पाटील यांचा कजिया शिमग्याचे खेळांत जाहला, इ. स .१७५४-५५ खमस खमलेन ते समयी प्रवरासंगमकर पाटील याणी टोकेकर साखरोजी पाटील याचा मया व अलफ. पुत्र रामजी पाटील याचा हात तोडला, व आणखी दोन चार माणसे जिल्हेज ४. जखमी केली, सबब प्रवरासंगमकर पाटिलाची पाटीलकी जप्त करून व आणखी मोजे मजकूरचा अंमल जागीर करून सरकारांत ठेऊन सरकार तर्फेने तुह्मास कमाविस सांगितली असे. तरी पाटीलकीचे हकदक मानपान शेते व मळे कुल जे असेल ते व कसबे मजकूरचा अंमल जागीर व चौथाई व सरदेशमुखी कुल जप्त करून सरकारांत वसूल घेणे, व प्रवरासंगमकर पाटील ज्यांणी खून केले ते व कोळी असे कैद पाठवून देणे ह्मणून सनद १. ये विशीं मौजे मजकुरास सनद कीं यांजकडे अंमल लिहिलेप्रमाणे देणे. Hurt. 3 and the five bighas out of the land belonging to the 3 persons, as also the house of Sultanji and Baji were given to Yesvantra's son Bhagwantrao. ( 83 ) In a quarrel between the Patels of Pravara Sangam and Toka during the Shimga festival, the foremen cut off a hand of the latter's A. D. 1754-55. son, and inflicted inquiries on 3, or 2 other persons. His Watan was therefore attacked, and he was ordered to be arrested and sent to Poona ( This case was decided on 18th of Moharum and the Patel of Pravara Sangam was ordered to surrender half a chahur of his land to the Patel of Toka.)