पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सवाल १ ५४ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [८१ ] मौजे अंबळनेर तर्फ मानूर येथील बाळोजी पाटील याणे पाटीलकीचे कजियामुळे - भावास जीवे मारून त्याची मुलेमाणसें कैद करून गांवची गढी बळइ. स. १७६०-६१. इहिदे सितैन काऊन वसूल देत नाही. यामुळे वरकडही गांवकरी लबाडी करून मया व अलफ. वसूल देत नाहीत ह्मणोन हुजूर विदित झालें. ऐशास मशारनिल्हेची " गढी पाडावी लागते सबब हे पत्र तुह्मास सादर केले असे. तरी तुह्मी दोन तोफा बमय सरंजाम देऊन व गाडदी शंभर येणे प्रमाणे देऊन गढी पाडून मालोजी ' पाटील यास राजश्री धोंडो गणेश कमाविसदार तर्फ मजकूर याचे हवाली करणे. येविशीं ढील न करणे. सत्वर पाटलाचें पारपत्य करणे व तर्फ मजकूरचे गांवगन्ना तुह्माकडील तोफखान्याचे लोक लाकुड फाटीयाचे वगैरे उपसर्ग देतात त्यांस ताकीद करून उपद्रव होऊ न देणे ह्मणून हरबाजी पांडुरंग दिमत त्रिंबक खंडेराव याशी चिटणिशी पत्र १. [ ८२ ] भगवंतराव बिन येशवंतराव क्षीरसागर पाटील मौजे वाठार कर्यात वढगांव प्रांत पन्हाळा हल्ली वस्ती मौजें कामेरी तर्फ वाळवें प्रांत कन्हाड याणी कसबें इ. स. १७६०-६१. “इहि सितन पुणे येथील मुक्कामी सन तिस्सा खमसेनांत हुजूर येऊन अर्ज केला की, मया व अलफ. आपले तीर्थरूप कुटुंबासहित मौजें मजकुरी वीस पंचवीस वर्षे सुख सवाल १९ - वस्तीस राहत होते. त्यास अलीकडे चार वर्षे सदरहू गांवीं निंबाजी बिन माणकोजी ढोकल्या मिरासदार कुणबी याचे मिराशी शेत आहे ते कुणबी मजकूर व तीर्थरूप मिळोन निमे वाट्याने करीत होते; त्यास सदरहू शेत दिवाण दाखल नऊ बिघे असतां कुणबी मजकुराने तफावत करून बारा बिघे सांगोन चार वर्षे बारा बिध्यांचा धारा घेतला हे वर्तमान तीर्थरूपास कळले; त्यावरून तीर्थरूपी कुणबी मजकुराजवळ दरसाल दीड बिध्याचा पैका जास्ती घेतला तो चहूं वर्षांचा मागितला व पंचांनी वाजवी पैका द्यावा ह्मणोन सांगितले; त्यावरून कुणबी मजकुराने दावा धरून सुलतानजी बिन अग्नोजी व बाजी बिन बहिरोजी कदम पाटील मौजें मजकूर यांचे पाठीशी जाऊन उभयतां मिळोन कजिया करून अदावतीमुळे आपले ( 81.) Baloji Patel of Ambalner in Tarf Manur, murdered his brother in connection with a dispute regarding the Patilki watan, imprisonA. D. 1760.61. ed his family, took possession of the village गढी (a strong fortified place) and refused to pay in the Government dues. The ryots also would not therefore pay the revenue. Orders were issued to Harbaji Pandurang for the bombardment of the place with the help of 2 canons and 100 soldiers, and for the capture of the Patel and his surrender to the Kamavisdar. ( 82.) A dispute having taken place between Yesvantrao Kshirsagar of Kameri in Tarf Walve of Prant Karad and his tenant, in regard A. D. 1760-61. to the amount of land revenue due, the tenant with the help of Sultanji and Baji Kadam, Patels of the village, murdered