पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [७६ ] जानो मल्हार वगैरे देशपांडे परगणे फलटण यांणी बाबुराव सखदेव देशपांडे यांशी , कजिया करून घरावर चालोन जाऊन खून केले; सबब परगणे मजकूरचे इ. स. १७५६-५७. सब खत वतन देशपांडे याजकडील देशकुळकर्ण व कुलकर्णे व जोतिषपण मया व अलफ. दरोबस्त सरकारांत जत करून राजश्री बाजी आनंदराव किल्ले सिंहगड १०. यांस पाठविले आहेत. तरी हे वतनाचे कामकाज करतील. त्यास हकदक मानपान इनाम वतनसंबंधे देहाये मजकुरी देशपांडे यांजकडील चालत असेल तें मशारनिल्हेकडे देणे. परगणे मजकूरचे देशपांडे यांस वतनाचे कामकाज करावयाशी संबंध नाही. ह्मणोन देहाये परगणे मजकूर यांस सनद. [७७ ] बाळाजी कृष्ण कमाविसदार देशमुखी दंडा राजपुरी याचे नांवें सनद की नागोजी . सुतार वस्ती मौजें दहिवली तर्फ गोंवळे यांणी हुजूर विदित केले की, इ. स. १७५८-५९. ॐ तिसा खमसेन आपली सून वेड लागोन घरी नांदेना, यास्तव मासचे भय दाखवून मया व अलफ. खांबाशी बांधोन ठेविली तेथेच मेली. यामुळे देशमुखी दंडा मजकूरचे जमादिलाखर १९. - 5. कमाविसदारांनी गुन्हेगारी चाळीस रुपये घेतले आहेत ते माफ करावे ह्मणान. त्याजवरून सुतार मजकुराचा अन्याय जाहला खराच. परंतु सुतार गरीब नादार सबब सदरह गन्हेगारीपैकी निमे करार करून निमे गुन्हेगारी माफ केली. तरी चाळास रुपया वीस रुपये देशमुखीचे हिशेबी जमा करणे. बाकी वीस रुपये सुतार मजकुरास माघारे दण ह्मणोन सनद. रसानगी यादी. [७८] बापूजी बिन आवजी नाईक जपे वस्ती कसबें राहुरी त्याचा पुत्र मुरारी आठा नवा ..वर्षांचा होता तो मल्हार गोपाळ व लक्ष्मण गोपाळ कुळकर्णी कसबे ई स. १७६०-६१. इहिदे सितेन मजकुरी यांणी निरापराधे जीवें मारिला ह्मणोन हुजूर विदित जाहले. मया व अलफ. त्यावरून कसबे मजकूरचे दरोबस्त कुळकर्णाचे वतन सरकारांत जप्त सफर ४. करून कुळकर्णाचे कामकाजास यादो पांडुरंग क्षीरसागर कारकून हुजुरून पाठविले आहेत. याशी रुजू होऊन दरोबस्त कुळकर्णाचा हकदक मानपान कुल जो होईल तो याजकडे वसूल देणे ह्मणून मोकदम कसबें राहुरी तर्फ मजकूर परगणे संगमनेर यास सनद १. ( 76 ) Jano Malhar Deshpande of Pargana Faltan quarrelled with Baburao A. D. 1756-57 Sakhdeo Deshpande, attacked his house, and committed mur ders. His watan was therefore attached. ( 77 ) A daughter-in-law of Nagoji carpenter turned insane and would not live in the house. She was therefore threatened with beating A. D 1758-59. and was tied to a post where she died. The Kamavisdar fined ____the carpenter Rs. 40 A petition was made to the Peshwa, who having regard to the poverty of the carpenter ordered a remission of half the fine. (78) Malhar Gopal Kulkarni killed without any excuse a son of Bapull A. D. 1760-6'. bin Awaji Naik of Rahuri. His watan was therefore attached