पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. wwwxxx [ ५९ ] त्रिंबकराव सदाशिव दिमत सदाशिव दामोदर पथक यास पत्र की रूपसिंग भोसले याणी परगणे झसे सरकार नांदेड येथे दंगा करून माहालाची खराबी इ. स. १७६०-६१. इहि सितैन केली. सरकारची ठाणी व कमाविसदार उठविले. तेव्हां बाळाजी महिपतमया व. अलफ. राव कमाविसदार मोकाशी परगणे मजकूर याणी सुरेराव शेळके यांस __जिलकाद १५

  • कुमकेस आणून रूपसिंग भोसले याचे पारिपत्य केले. त्यांनी ठाणीठुणीं घेतलेली सरकारचे कमाविसदारांनी घेऊन आपला सरकार अंमल बसविला. रूपसिंग भोसले पळोन घोगरीस ठाणीयांत जाऊन बसले. उपरांतिक तुह्मी जाऊन त्यास कोंडून घोडी उंटें हत्यारे वगैरे चीजवस्त त्याची तुह्मी घेतली ह्मणोन हुजूर विदित झाले. ऐशियास सदरहु वस्तभाव हत्यारे घोडी उंटें हुजूर आणविली असत. याजकरितां हे पत्र तुह्मास सादर केले असे. व महिपतराव प्रल्हाद कारकून दिमत हुजरात पाठविले असे. तरी त्यांची उंटें घोडी हत्यारें वस्तभाव तुह्माकडे आली असेल ती व गोपाळ केशव व पद्माकर कृष्ण वगैरे यांजकडे असेल ती कुल जराबजरा मशारनिल्हेच्या हवाली करून पावलीयाचे कबज घेणे. या कामांत सरकारचे ढालाईत पाठविले असेत. यांचे मारफतीने सदरहु लिहिल्याप्रमाणे यांचे स्वाधीन करणे. रूपसिंग भोसले यांस हुजूर न पाठविणे. जेथे आहेत तेथेच मजबुदीने ठेवणे ह्मणोन पत्र १.

कित्ता पत्र घोडी उंटे वगैरे में तुह्माकडे आले असेल तें महिपतराव प्रल्हाद याचे हवाली करणे ह्मणोन. १ गोपाळ केशव दिमत महिपतराव कवडे यांस. १ पद्माकर कृष्ण शिलेदार यांस. १ शिलेदार दिमत महिपतराव कवडे यांस. ४ चिटणिशी पत्ने. [६०] येवजी लोहट तालुके कावनई यास पत्र की मुजफरखान याणी हरामखोरी केली याजमुळे त्याचे निसबतीस रामचंद्र नारायण होते, यास किल्ले मदनगडास इहिदे सितैन अटकेस पाठविले आहेत. त्यास जामीन बाबुराव हरी हुजूर घेतला असेत. मया व अलफ. याजकरितां हे पत्र तुह्मास सादर केले असे. तरी रामचंद्र नारायण यास जमादिलावल ९. सोडणे ह्मणोन चिटणिशी पत्र १. ( 59 ) Rupsing Bhosle raised an insurrection in the province of Nanded, and captured Government posts. These were afterwards recovered by A. D. 1760-61. the Kamavisdar. Bhosle was sent to prison. His property consis ting of horses, camels, arms &c., was ordered to be sent to Poona. (60) Muzfarkhan having committed treachery, his servant Ramchandra Narayan was kept in confinement. Security was taken for RamA.D. 1760-61. chandra at the Huzur and he was then ordered to be released.