पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [४७] शंकराजी केशव यास पत्र कीं, येशवंतराव व्यंकटेश पाटील मौजे भाटेपुरी परगणे राजणी याजकडे पाटीलकीचें कजिया बाबत सन सबांत रुपये ५००० इ. स. १७६०-६१. इहि सितन पाच हजार सरकारची नजर करार करून निवाडपत्र करून दिल्हें. नजरेचे मया व अलफ. ऐवजाची हप्तेबंदी करून रा. नरहर लक्ष्मणराव यांजकडे वसुलास दिल्हें मोहरम १०. होत. त्यापैकी दीडहजार रुपये वसूल झाले. बाकी ऐवज येणे हप्तेबंदी रुपये १००० सन सितैन. १२५० सन इहिदे सितैन. १२५० सन इसने सितैन. ३५०० येकण साडेतीन हजार रुपये येणे. याकरितां पाटील मजकूर हुजूर आणन अटकेंत ठेविला होता. त्यास ऐवज द्यावयास सामर्थ्य नाही. याकरितां पाटीलकीचे वतन सरकारांत जप्त करून पाटील मजकूर यास निरोप दिल्हा असे. तरी तुह्मीं सदरहू मौजे मजकूरचे पाटीलकीचे वतन कुल शेतभात हकइनाम असेल तें सरकारांत जप्त करून सदई साडेतीन हजार रुपये वसूल घेऊन सरकार हिशबी जमा करणे ह्मणोन सनद. रसानगी हिशेब मखलाशी हिशेब. [४८] महादशेट व गोंदशेट वलद हरशेट सोनार देवरुखकर यांणी हुज़र विदित केलें की, माहाल देवरूख कसबें मजकूर प्रांत राजापूर येथील पोतदारांचे वतन इ. स. १७६०-६१. हिसिन सुदामत पूर्वापार आपलें आहे. त्यास आपले वडील परागंदा झाले. गांवी मया व अलफ. कोणी नव्हते. तेव्हां बाबाशेट मुक व गोंदशेट या हरदुजणांचे वडील कसबें रबीलावल २. मजकुरी येऊन राहिले. आणि गांवचे पोतदारीचे कामकाज करू लागले. कदीम वतनदार नाही. सबब पोतदारी चालवून हक्क उत्पन्न अनभविले. याउपरी आमचे वडील पंचवीस तीसवर्षांनंतर कसबें मजकुरीं आले. आणि हरदुजणांस दोहीदुराई केली. ते समयीं प्रांत मजकूरची हकीमी गंगाधर पंडित प्रतीनिधी यांजकडे होती. सबब विशाळगडी फिर्याद ( 47 ) A dispute regarding the Patilki Watan of Bhatipuri in Pargana Ranjni being decided, a Nazar of Rs. 5000 was imposed on the A. D. 1760-6I. Patil. He failed to pay the amount and was therefore im prisoned. His Watan was attached and orders were issued for the recovery of the Nazar from its proceeds. ( 48 ) A Potadar was absent from his village for about 25 or 30 years; and another man was doing the duty of the Watan during than period. The Watandar having returned to the village, a dise A. D. 1760-61..