पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. ३ वर्तमान भावी कमाविसदार यांसी. १ परगणे करकंब. १ परगणे टेंभुरणी. १ परगणे भोसे. ३ देशमूख व देशपांडे यांसी. १ परगणे करकंब. १ परगणे टेंभुरणी. १ परगणे भोसे. [४५] नरहर लक्ष्मणराव कमाविसदार परगणे शेवगांव यास सनद की, यशवंतराव व्यंकटेश व बापूजी गोपाळ पाटील मौजे भाटेपुरी, परगणे रांजणी या इ. स. १७५६-५७. सब्बा खमसेन हरदुजणांचा मौजे मजकूरचे मोकदमीचा कजिया होता. त्यास मौजे मया व अलफ. मजकूरची मोकदमी सालगुदस्ता सरकारांत जप्त केली होती. त्यास हरजमादिलावल २२. दुजणांचा इनसाफ मनास आणून निवाडपत्र करून देऊन जप्ती मोकळी करून यशवंतराव व्यंकटेश याजकडे सरकारची नजर करार केली. सालबंदी. रुपये. १००० सन सब्बा खमसेन साल मजकूर. १००० सन समान खमसेन. १००० सन तिस्सा खमसेन. १००० सन सितेन. १००० सन इहिदे सितेन. ५००० येणेप्रमाणे पांच हजार रुपये सरकारची नजर करार केली असे. तरी सदरहु सालाच सालांत चैत्रमासी घेऊन सरकारचे हिशेबी जमा करीत जाणे ह्मणोन सनद १. रसानगी यादी. ( 45 ) A dispute regarding the Patilki Watan of Bhatepuri in Parganic Ranjani ( Shewagaon) was decided, and the Watan was released A. D. 1756-57. from attachment and a nazar of Rs. 5,000 was levied.