पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते ( अ ) दिवाणी.-7 Administration of Justice (a) Civil २९ सुभाना दासीपुत्र याचा कागद.. "शके १६७६ भावनाम संवत्सरे माघ शुद्ध चतुर्थी गुरुवासर ते दिवशी मातोश्री आनंदीबाई याचा पुतण्या बाळंभट बिन हणमंतभट फुलबडवे जोशी मौजे बेंबले परगणे करकंब वगैरे गांव महालानिहाय यांशी सुभाना दासीपुत्र निसबत मजकूर सन ११६४ कारणे कागद लिहून दिला, ऐसाजे. तुमचे वतन मौजे मजकूर व मौजे घोटी निमे परगणे भोसे एकूण गांव दीड व नारायणभटाचे गांव मौजे पन्हेते व निम घोटी प्रांत भोसे एकूण गांव दीड. यास नारायण भटाचे बुडाले. मग तिन्ही गांव खंडभट खाऊ लागले. खंडभट मेल्यावरी मी तुमचा दासीपुत्र वतन चालवू लागलो. त्यासी तुह्मास ते गोष्टी मानेना. ह्मणून मौजे बेंबले तुमचे हवाली केलें. निमे घोटीचे जोतिषपण नारायणभटाचे विल्हेचे आपण चालवीत होतो. त्यास तें वर्तमान श्री. रा. पंत प्रधान साहेबांस कळल्यावर त्यांहीं मजला हुजूर आणिले. त्यावरी वर्तमान पुसिलें तेव्हां आपण सांगितले की, आपण याचे वतनाशी वारशी करीत नाही. मालक खावंद उभयतां आहेत. यांणी वतने सुखरुप खावी असें बोलोन हा कागद लिहून दिला असे. तुमची वतनें तुझा खाणे. आपणास तुमच्या वतनांशी व नारायणभटाचे वतनाशी संबंध नाही. हा कागद लिहून दिल्हा बीतपशील." येणेप्रमाणे कागद मनास आणितां तुमचा व खंडभटाचा व नारायणभटाचा वंश एक. त्यांचे बुडालें. दरोबस्त वतनाचे धनी तुह्मीच आहां. हे जाणून तुह्मास निवाडपत्र सादर केले असे. तरा तुह्मी त्रिवर्ग सदरहु चारी गांवचे जोसपण पुत्र पौत्रादि वंशपरंपरेनें अनुभवून सुखरूप राहणे. वतनसंबंधे तुमचे माथां शेरणी रुपये १०१ एकशेएक करार केली असे. सदरहुचा वसूल सरकारांत देऊन वतन अनुभवून सुखरूप राहणे. जाणिजे छ. १२ रविलावल. १ ऐन निवाडपत्र, १० ये विषयीं ताकीद पत्रे सदरहु प्रमाणे. ४ गांवगन्ना.. १ मौजे आकोले परगणे टेंभुरणी. २ परगणे भोसे. १ मौजे पन्हेते. १ मौजे घोटी. १ मौजे बेंबले परगणे करकंब,