पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૨૮ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. कारकून व जमीदार परगणे पुणे यांणी हुजूर. वर्तमान निवेदन केले व तुझी विनंती केली की, आपणास आनंदीबाईने व दासीपुत्राने कागद लिहून दिल्हे आहेत. ते मनास आणून सरकारचे पत्र भोगवटीयास करून दिल्हें पाहिजे. ह्मणून विनंती करून आनंदीबाईने व दासीपुत्राने तुमचे नांवें पत्र लिहून दिल्ही आहेत. ती आणून दाखविली तें मनास आणितां त्यांत मजमून: "शके १६७६ भावनाम संवत्सरे कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते दिवशीं चिरंजीव मल्लारभट बिन आपभट ई बिन हणमंतभट व निंबभट बिन हणमंतभट व बाळंभट बिन हणमंतभट फुलबडवे जोशी मौजे बेंबले परगणे करकंब व मौजे पन्हेते व मौजे घोटी परगणे भोसे व मौजे आकोले परगणे टेंभुरणी यांसी आनंदीबाई कोम खंडभट फुलबडवे जोशी देहाये मजकूर सुहूर सन खमस खमसेन मया व अलफ सन ११६४ कारणे कागद लिहून दिला ऐसाजे, तुमचा आमचा मूळ पुरुष जीऊभट यासी तिघे पुत्र वडील मल्लारभट, दुसरा विठ्ठलभट, तिसरा नरसिंहभंट याचा विस्तार बीतपशील:-वडील पुत्र मल्लारभट त्यास पुत्र नारायणभट याचें नकल झाले. दुसरा विठ्ठलभट त्यास पुत्र जिऊभट. याचे नकल झाले. तिसरा नरसिंह यासी पुत्र दोघे. वडील गोविंदभट, धाकटा लक्ष्मणभट. यांचा वंशः-- गोविंदभट याचा पुत्र रंगभट, याचा खंडभट आपले भ्रतार. याचे नकल झाले. दुसरा लक्ष्मणभट, यास पुत्र येमभट, याचा हणमंतभट, यांसी पुत्र चौघे. १ वडील आपभट, त्याचे पुत्र तुझी मल्लारभट. १ दुसरे निंबभट तुझी. १ तिसरे गोपाळभट ब्रह्मचारी झाले आहेत. १ चवथे तुझी बाळंभट. येणेप्रमाणे वंशावळ आहे. त्यास अवघ्यांचे बुडालें; येमभटाचा वंश तुझी तिघेजण आहा. तुमचा आमचा वंश एक. वतन सदरहु चार गांव समाईकच होते. नाराययणभट निराळा निघाला तेव्हां मौजे पन्हेते मौजे घोटी निमे चालवीत होता. बाकी अडीच गांव राहिले ते समाईकच होते. त्यावरी जिऊभट मृत्यु पावले. त्यांचे बुडाले. मग निमे घोटी व मौजे बेंबलें खंडभट आपले भ्रतार चालवीत होते. मौजे आकोले तुमचा बाप हणमंतभट चालवीत होते. त्यास नारायणभटाचे बुडाले. तेव्हां तोही दीड गांव खंडभट आपले भ्रतार चालवू लागले. त्याजवरी आपले भ्रतार खंडभट मृत्य पावले. त्याचे नकल झाले. त्याचे उत्तर कार्य तुझी केले. व आपले संगोपन करीत आहां. सदरहु चारी गांवचे वतन तुमचे आमचे अवघ्यांचे होते. त्यांशी आमचे बुडालें. वतनाचे धनी तुझी आहां. सुखरूप चहुगांवचे वतन अनुभवून खाण, हा कागद लिहून दिला. सही. " बीकलम वेंकाजी केशव देशपांडे परगणे मंगळवेढें.