पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. (३१) विश्वासराव यांस पत्र की, सदाशिव नाईक काळे पुणतांबेकर यांचे कर्ज ___ चतुर्भुज मल्हार याजकडे येणे. त्याविषयीं उभयतांचा परस्परें इ. स. १७५२-५३. सलास खमसैन कजिया आहे. त्यास चतुर्भुज मल्हार याचे देशपांडेपणाचे गांव मया व अलफ पेशजी आहेत ते व हल्ली नवे साधिले आहेत ते कुल गांव जप्त जिल्हेज २१. करावे या विषयी तुझांस हे पत्र लिहिले. तरी याचे देशपांडेपणाचे गांव जे असतील ते कुल सरकारांत जप्त करणे ह्मणोन पत्र १. (३२) महिपतराव कवडे यांस पत्र की, नारायणदास अंबाईदास नंदुरबारकर व संभुदास केसोजी यांचा दुकानाचा कजिया आहे. त्यास संभुइ. स. १७५३-५४ अखि मसैन दास कुकरमुडे येथे राहतो. त्यास' आणावयास सरकारचे मया व अलफ. जिल्हज ९. ढालाईत व तुमचा महामुनी गोपिनाथ यांसी हुजूरचे पत्र सादर जाहले की, संभुदास मजकुरास हुजूर पाठवणे. असे असतां महामुनी गोपिनाथ याने संभुदास मजकुरास गांवांत छपावून राखिले. सरकारचे ढालाइतास वीस पंचवीस रुपये देऊन माघारे हुजूर पाठविले ह्मणून नारायणदास मजकुराने सांगितले. ऐशास संभुदास गांवांत असतां महामुनीने छपावून राखिले असा लबाड. त्यास, महामुनीकडे अन्याय लागला तरी अमलावरून दूर करणे. आणि संभुदासास ताकीद करून त्याचा याचा कजिया दुकानाचा असेल तो मनास आणून वाजवी कजिया विल्हेस लावून कर्जाचे ऐवजाची सरकारची चौथाई कर्जाची घेऊन बाकी ऐवज नारायणदासास देणे ह्मणोन पत्र १. ( 31 ) A letter to Wishwasrao--Chaturbhuj Malhar owes a debt to Sadasiva Naik Kale of Puntambe, and there is a dispute between the two A. D. 1752-53. about it. This is to direct you that the villages appertaning to the Deshapande Watan of Chaturbhuj, both, those which belong to him of old, and those newly acquired, should be attached. ( 32 ) There being a dispute between Narayan Ambaidas of Nadurbar, and A. D. 1753-54. ____Sambhudas Kesoji of kukarmude, in regard to a shop. 2 horse men were sent to get him to Poona, and the agent of Mahipatrao Kawade was directed to assist them. The agent however concealed Sambhudas and sent away the horsemen by paying them Rs. 20 or 25. Mahipatrao was now asked to remove the agent from his office and to settle the dispute between the parties, remitting one-fourth of the amount of debt to Government.