पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [१७] नरसावा बिडवाई ममदापुरकर याचे कर्ज जमीदार परगणे संगमनेर याजकडे होते, त्याचा करार पंचाइत न्यायें रुपये २००० दोन हजार द्यावयाचा इ. स. १७४९-५० खमसेन करार केला. यासी हप्ते रुपयेःमया व अलफ, १००० सालमजकुरी माघमासी द्यावे. मोहरम १९ १००० पेस्तर साली सन इहिदेंत माघमासी द्यावे. येणप्रमाणे दोन हजार रुपयांचे हप्ते करार केले आहेत. सदरहू प्रमाणे वसूल घेऊन हुजूर पाठवून देणे. जमीदाराचे खत बिडवाई मजकुराजवळ होतें तें तुम्हाकडे पाठविले आहे. तरी ऐवजाची निशा करून घेऊन मग खत जमीदाराचे हवाली करणे. सदरहू ऐवजाची जमीदार आपले भाऊपणीयांत वाटणी करून देतील त्याप्रमाणे निशा करून घेणे ह्मणोन राघो गोविंद यास सनद १. [१८] राघो गोविंद यास पत्र की पुरुषोत्तम माणकेश्वर कुळकर्णी मौजे करजगांव परगणे नेवासे याचे कर्ज हरजी कंक चौगुला मौजे मजकूर याजकडे इ. स. १७५०-५१ इहिदे खमलेन वगैरे गांवगन्ना कुळांकडे आहे व माधवराव देशपांडे परगणे संगमनेर मया व. अलफ. यांजकडे कर्ज आहे ते देत नाहीत, तरी त्यांस ताकीद करून वाजवी रजब १ खताप्रमाणे कर्ज वसूल करून देववावें ह्मणून विदित केले. त्यावरून हे पत्र तुह्मास सादर केले असे. तरी कुळकर्णी मजकूर याचे कर्ज वाजवी खताप्रमाणे वसूल होऊन कुळकर्णी यास पावतें करणे, आणि सदरहू ऐवज वसूल होईल त्यापैकी सरकारची चौथाई कुळकर्णी मजकूर याजपासोन घेऊन हुजूर पाठवून देणे ह्मणोन पत्र. A.D.1749-10. (17) The amount of a debt, due by the Jamindars of Sangamner to Narbawa Bidwai, was fixed with the assistance of a Panch. ( 18 ) A letter addressed to Ragho Govind, to the following effect:-Pur shotam Mankeshwar, Kulkarni of Mouza Karajgaon, Pargana A. D. 1750-51. Nevase, represented that Harji Kank, Choughula of the said village, some ryots of other villages, and Madhavrao Deshpande of Pargana Sangamner did not liquidate the amount due by them to the said Kulkarni, and prayed that they be warned to pay off the debt in accordance with the terms of their bonds. It is therefore ordered that the said debts be collected in accordance with the terms of the bonds, and made over to the said Kulkarni after delucting one-fourth of the sum collected, which should be remitted to the Huzur.